आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:59 PM2018-06-15T20:59:27+5:302018-06-15T20:59:27+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेने प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दरामध्ये १८ टक्के वाढ केली आहे.

Loads of passenger pickets from today | आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार

आजपासून वाढणार प्रवाशांच्या खिशावर भार

Next
ठळक मुद्देतिकीट दरवाढीने प्रवासी संतापले : डिझेल व कर्मचारी वेतन वाढीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेने प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दरामध्ये १८ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याने त्यांच्या खिशावरील भार वाढणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री १२ वाजतानंतर ही दरवाढ लागू होणार आहे. याचा अर्थ १६ जूनच्या सकाळपासून नवीन तिकीट दर आकारले जाणार आहे. मागील दोन तीन वर्षांत डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. कर्मचाºयांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ करणे आवश्यक होते. असे कारण महामंडळाकडून दिले जात आहे. प्रवाशांनी या दरवाढीवर नाराजी व तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीनुसार, ६ किमीसाठी पहिला ठप्पा राहील. पहिल्या ठप्प्यासाठी आधी ७ रूपये घेण्यात येत होते. आता त्यासाठी ९ रूपये आकारले जाईल. परंतु तिकीटच्या रूपात १० रूपये वसूल करण्यात येईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १० रूपये घेण्यात येत होते. आता तिकीट दर १२ रूपये असेल. परंतु बसमध्ये प्रवाशांकडून तिकीटचे १० रूपये वसूल केले जाईल. दोन ठप्प्यासाठी आधी १४ रूपये घेतले जात होते. आता तिकीट दर १६ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून राऊंड फिगरमध्ये १५ रूपये वसूल करण्यात येईल. २.५ ठप्प्यासाठी आधी १७ रूपये भाडे घेण्यात येत होते. आता हे भाडे २० रूपये होत आहे.
एवढेच तिकीट दर वसूल केले जाईल. तीन ठप्प्यासाठी आधी २० रूपये तिकीट दर घेण्यात येत होते. आता ते २३ रूपये होईल. परंतु प्रवाशांकडून २५ रूपये वसूल केले जाईल.
सदर तिकीट दर केवळ साधारण बसकरीता लागू नसून रातराणी व एशियार्ड बससेवेवरसुद्धा लागू करण्यात आले आहे. रातराणीचा प्रथम ठप्प्याचे दर ८ रूपये होते, आता १० रूपये होईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १२ रूपये दर होते, आता १४ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून १५ रूपये तिकिटाचे वसूल केले जाईल. दोन ठप्प्यासाठी आधी १६ रूपये होते, आता १९ रूपये होत आहे.
परंतु प्रवाशांकडून २० रूपये तिकिटासाठी वसूल केले जाईल. २.५ ठप्प्यासाठी आधीचे भाडे २० रूपये होते, आता २३ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून २५ रूपये घेण्यात येईल. एशियार्ड बस सेवेचा पहिल्या ठप्प्याचे दर १० रूपये होते, आता ११ रूपये झाला आहे. परंतु प्रवाशांना १० रूपयांतच तिकीट देण्यात येईल. १.५ ठप्प्यासाठी आधी १४ रूपये घेण्यात येत होते, आता १६ रूपयांची तिकीट राहील.
परंतु प्रवाशांना १५ रूपयांमध्येच तिकीट द्यावी लागेल. दोन ठप्प्यासाठी आधी १८ रूपये भाडे घेण्यात येत होते. आता २१ रूपये होत आहे. परंतु प्रवाशांकडून २० रूपयेच तिकिटाचे घेण्यात येईल. २.५ ठप्प्यासाठी आधी तिकीट दर २३ रूपये होते, आता २७ होईल. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांकडून २५ रूपये वसूल केले जाईल.
 

Web Title: Loads of passenger pickets from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.