गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १६ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. यात आता १ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी सोमवारी जारी केले. या आदेशामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांसह निर्बंधित बाबी वगळून इतर उपक्रम अटी व शर्तींसह सुरु राहतील. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंडसंहिता १८६०नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
.....
बाहेरील राज्यातून येणाऱ्यास आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Øकोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह
अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या
चाचणीचा असणे अनिवार्य आहे.
Ø ........
मालवाहू वाहनात केवळ दोन व्यक्तिंना मुभा
Øमालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनामध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर हेल्पर) यांना प्रवास
करण्याची मुभा असेल. हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना
आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासांपूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील...........
नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई
Øस्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या
कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवतील.
काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नसल्याचे आढळल्यास त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
......
दुधाच्या होम डिलिव्हरीला मुभा
Øदूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू
असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी
किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
......
...यांना प्रवासाची मुभा
Øकोविड १९ व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्याची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची
मुभा असेल. काही भागांमध्ये निर्बंधात वाढ करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. तसेच यापूर्वी जाहीर केलेले सर्वच निर्बंध लागू राहतील.