कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शनिवारपासून (दि.२३) राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर आता शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर आता करडी नजर ठेवली जाणार आहे. प्लास्टीक बंदीसाठी उत्पादक व मुख्य वितरकांकडे धाड टाकली जाणार असून अगोदर दंड मात्र त्यानंतर थेट कारवाईच केली जाणार आहे.प्लास्टीक बंदीचा विषय मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळत चालला आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती. परिणामी प्लास्टीक साहित्यांचा वापर वाढत चालला आहे. वाढती मागणी बघता निरनिराळ््या वस्तूंचे उत्पादन व विक्री सर्रास सुरू आहे. दैनंदिन जिवनात प्लास्टीक एक अविभाज्य अंगच बनले आहे. मात्र प्लास्टीकचा अती वापर आता पर्यावरणात अत्यंत परिणामकारक ठरत आहे. मानवी जिवनावरही त्याचे प्रतिकुल परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे २३ जूनचा मुहूर्त साधून राज्यात प्लास्टीक बंदीची घोषणा करण्यात आली.उच्च न्यायालय व राज्य सरकारचेच आदेश असल्याने आता यातून काही मार्ग निघत नसल्याचे बघून सर्वत्र प्लास्टीक बंदीच गाजत आहे. प्लास्टीक बंदीच्या या विषयाला सहकार्य करीत काही व्यापाऱ्यांकडून स्वेच्छेने प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद केला आहे. मात्र ते प्रमाण अत्यंत कमी असून यावर पूर्णपणे बंदी यासाठी आता नगर परिषदेने कंबर कसली आहे. शहरातून प्लास्टीक पिशव्या हद्दपार व्हावे, यासाठी नगर परिषदेकडून मोहीम राबविली जाणार आहे. यात प्लास्टीक उत्पादकांपासून ते वितरकांवर धाड टाकून कारवाई केली जाणार आहे. प्लास्टीक बंदीच्या कायद्यात दंडाची तरतूद असल्याने एकदा तर दंड मात्र त्यानंतर नियमानुसार कारवाईच केली जाणार असल्याचेही मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.झोन सुपरवायजरचे राहणार लक्षशहरात नगर परिषदेचे सहा झोन (विभाग) आहेत. या झोनमधील सुपरवायजर व त्यांच्या मदतीला सहा कर्मचारी असे पथक नगर परिषदेने तयार केले आहे. हे पथक आपपल्या झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांवर नजर ठेवून राहणार आहेत. कुठे प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसताच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या पथकावर नगर परिषदेचे सॅनीटरी इंस्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) नजर ठेवतील तर या निरीक्षकांवर विभागातील अभियंत्यांचे नियंत्रण राहणार आहे. सर्वांनाच प्लास्टीकचा वापर होत असताना दिसल्यास कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे.मुख्याधिकारी उतरणार मैदानातप्लास्टीक बंदीचा विषय गंभीर होत असून नगर परिषदेने यापूर्वीही प्लास्टीक बंदीसाठी पाऊल उचलले आहे. मात्र शहरातील व्यापाऱ्यांकडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व उर्मट वागणूक देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील स्वत: मैदानात उतरणार आहेत. पाटील स्वत: शहरातील उत्पादक व वितरकांकडे जाणार असून प्लास्टीक बंदी करवून घेणार आहे. त्यानंतरही त्यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यास कारवाई केली जाणार आहे.
प्लास्टिक पिशव्या वापरावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 9:19 PM
शनिवारपासून (दि.२३) राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर आता शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर आता करडी नजर ठेवली जाणार आहे.
ठळक मुद्देनगर परिषद लागली कामाला : प्लास्टिक बंदीसाठी कंबर कसली, विक्रेते दक्ष