दिव्यांगांच्या राज्य क्र ीडा स्पर्धा यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:25 PM2018-03-11T21:25:44+5:302018-03-11T21:25:44+5:30

दिव्यांग व्यक्तींच्या अंगी सुप्त क्र ीडा गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्र ीडागुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून ......

Make a success of the State Championship in Divyanagara | दिव्यांगांच्या राज्य क्र ीडा स्पर्धा यशस्वी करा

दिव्यांगांच्या राज्य क्र ीडा स्पर्धा यशस्वी करा

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : २३ ते २५ मार्चदरम्यान स्पर्धा

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : दिव्यांग व्यक्तींच्या अंगी सुप्त क्र ीडा गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्र ीडागुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून दिव्यांगांसाठी क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धा येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून या स्पर्धा यशस्वी करा असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्र ीडा संकुलात समाज कल्याण व विशेष सहाय्य विभाग तसेच कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्तवतीने २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेताना शनिवारी (दि.१०) ते बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-
भूजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, कृष्णा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामिसंग येरणे प्रमुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले यांनी, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरी
येथे होणाºया राज्यस्तरीय दिव्यांग क्र ीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून ३५०० विद्यार्थी व ५०० कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरु न क्र ीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचिवण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्र ीडा स्पर्धेच्या ठिकाणी १०८ क्र मांक अँम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धा बघण्यासाठी आणावे असे सांगितले.
अपंग कल्याण आयुक्त पाटील यांनी, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचिवण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मुकबधीर, मतीमंद,
अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात या क्र ीडा स्पर्धा होणार असल्याचे सांगितले.
समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी, क्र ीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई-रिक्शाची सुविधा तसेच खेळतांना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचारी सुविधा उपलब्ध करु न दयावी.
क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरु करावे. खेळाडूंसाठी काळजीवाहकांची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी असे सांगितले. तर
क्र ीडा स्पर्धेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती येरणे यांनी दिली. सभेला क्र ीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आभार मिलींद रामटेके यांनी मानले.

Web Title: Make a success of the State Championship in Divyanagara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.