ऊस मळणी यंत्रातून लाखोंचे उत्पन्न ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:02+5:302021-02-19T04:18:02+5:30

राजेश मुनीश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील हेटी / गिरोला येथील प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम गहाणे यांनी ऊस मळणी यंत्र ...

Millions of rupees from sugarcane threshing machine () | ऊस मळणी यंत्रातून लाखोंचे उत्पन्न ()

ऊस मळणी यंत्रातून लाखोंचे उत्पन्न ()

Next

राजेश मुनीश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील हेटी / गिरोला येथील प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम गहाणे यांनी ऊस मळणी यंत्र लावल्याने चार महिन्याकाठी तीन लाख रुपयांचा नफा कमविला आहे.

तालुक्यातील हेटी परिसरात जवळपास पाचशे एकरात ऊस पिकाची लागवड केली जाते. त्यापैकी दोनशे एकरवरील ऊस हे मळणी करण्याकरिता शेतकरी गहाणे यांच्याकडे आणतात. शेतकऱ्यांना देव्हाडा येथे साखर तयार करण्यापेक्षा गहाणे यांच्याकडे गूळ तयार करुन बाजारात विकणे, त्यांना सोयीचे होत आहे.

गहाणे यांनी ऊस मळणी यंत्र लावल्याने परिसरातील ५० ते ६० बेरोजगार युवकांना चार महिने रोजगार मिळत आहे, त्याचे समाधान पुरुषोत्तम गहाणे यांना मिळत आहे. गहाणे यांच्याकडे सेंद्रिय गूळ तयार केला जातो. सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे आहेत. त्यात केवळ तीन गूळ मळणी यंत्र बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी धान पिकापेक्षा ऊस पिकाची लागवड करून जास्त आर्थिक उन्नती केली पाहिजे, असे प्रतिपादन गहाणे यांनी केली आहे. तालुक्यातील शेतकरी आतापर्यंत केवळ धानाची लागवड करीत होते. मात्र आता ते इतर पिकांचे सुद्धा उत्पादन घेत आहे. हा देखील एक चांगला बदल आहे. शेतकऱ्यांनी पीक लागवड पध्दतीत बदल केल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ करण्यास मदत होत आहे. शिवाय यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

......

परिसरात विकसित होतेय गुळाची बाजारपेठ

जिल्ह्यात अलीकडे उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जवळपास ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड केली जात आहे. यातून बरेच शेतकरी गूळ तयार करुन त्याची विक्री करीत आहे. यामुळे परिसरात गुळाची बाजारपेठ विकसित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्नात वाढ करण्यास मदत होत आहे.

Web Title: Millions of rupees from sugarcane threshing machine ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.