"माझे आंदोलन व्यक्ती नव्हे तर वृत्ती विरोधात", डॉ. समीर गहाणेंचे छत्री आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:17 PM2021-05-18T18:17:06+5:302021-05-18T18:17:52+5:30

Gondia : माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्ती विरुद्ध नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटना विरुद्ध आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावी यासाठीच मागील सात दिवसापासून मी छत्री आंदोलन सुरु केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

"My protest is not against individuals but against attitudes" Dr. Sameer Gahane's umbrella protest | "माझे आंदोलन व्यक्ती नव्हे तर वृत्ती विरोधात", डॉ. समीर गहाणेंचे छत्री आंदोलन

"माझे आंदोलन व्यक्ती नव्हे तर वृत्ती विरोधात", डॉ. समीर गहाणेंचे छत्री आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन अश्लील शिवीगाळ करुन अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

गोंदिया : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी ९ मे रोजी जिल्हा परिषद वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेचा निषेध करीत खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी मागील बुधवारपासून छत्री आंदोलन सुरु केले आहे. तर मंगळवारपासून गोंदिया जि.प.समोर आंदोलन सुरु केले आहे. 

आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन अश्लील शिवीगाळ करुन अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांनाच अशा भाषेत बोलून अपमानित केले जाणे योग्य नाही. 

एकीकडे, डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होत असताना राज्य सरकारकडून कुठलीच कारवाई केली जात नाही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:च्या जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्ती विरुद्ध नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटना विरुद्ध आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावी यासाठीच मागील सात दिवसापासून मी छत्री आंदोलन सुरु केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी 'लोकमत'ला सांगितले. 

प्रशासन कधी घेणार दखल 
अलीकडे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग काळात डॉक्टरर्स आपल्या जीव धोक्यात घालून चौवीस तास सेवा देत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्यास कुचराई केली जात आहे. डॉ. समीर गहाणे यांनी मागील सात दिवसांपासून या सर्व प्रकाराबद्दल छत्री आंदोलन सुरु केले आहे पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
 

Web Title: "My protest is not against individuals but against attitudes" Dr. Sameer Gahane's umbrella protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.