शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

"माझे आंदोलन व्यक्ती नव्हे तर वृत्ती विरोधात", डॉ. समीर गहाणेंचे छत्री आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:17 PM

Gondia : माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्ती विरुद्ध नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटना विरुद्ध आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावी यासाठीच मागील सात दिवसापासून मी छत्री आंदोलन सुरु केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

ठळक मुद्देआमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन अश्लील शिवीगाळ करुन अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

गोंदिया : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी ९ मे रोजी जिल्हा परिषद वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेचा निषेध करीत खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी मागील बुधवारपासून छत्री आंदोलन सुरु केले आहे. तर मंगळवारपासून गोंदिया जि.प.समोर आंदोलन सुरु केले आहे. 

आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरुन अश्लील शिवीगाळ करुन अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांनाच अशा भाषेत बोलून अपमानित केले जाणे योग्य नाही. 

एकीकडे, डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होत असताना राज्य सरकारकडून कुठलीच कारवाई केली जात नाही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:च्या जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्ती विरुद्ध नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटना विरुद्ध आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावी यासाठीच मागील सात दिवसापासून मी छत्री आंदोलन सुरु केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी 'लोकमत'ला सांगितले. 

प्रशासन कधी घेणार दखल अलीकडे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग काळात डॉक्टरर्स आपल्या जीव धोक्यात घालून चौवीस तास सेवा देत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्यास कुचराई केली जात आहे. डॉ. समीर गहाणे यांनी मागील सात दिवसांपासून या सर्व प्रकाराबद्दल छत्री आंदोलन सुरु केले आहे पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. 

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस