लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१७) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९६.७९ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली बहेकार हिने ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी निधी किशोर भगत हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक पटकाविला आहे. मागील वर्षी दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात दुसऱ्या स्थानी होता. तर यंदा जिल्ह्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून ९८.२२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार २२८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९४०१ विद्यार्थी तर ९२१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ७८३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७३९९ तर व्दितीय श्रेणीत २८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.७९ टक्के लागला. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात घट झाली आहे. अविशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील दीडशे शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली बहेकार हिने ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी निधी किशोर भगत हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे निकालाची टक्केवारी पाहता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आहेत.
सर्वाधिक प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातगोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ४१.३७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर नागपूर जिल्ह्यात ३७.२३ टक्के विद्यार्थ्यांना ही श्रेणी मिळाली. जिल्ह्यातील एकूण १८ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९४०१ विद्यार्थी तर ९२१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ७८३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७३९९ तर व्दितीय श्रेणीत २८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालात सावित्रीच्या लेकीच सरस - बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातसुध्दा सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७१ टक्के आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.४७ टक्के आहे. ९१५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शहरापेक्षा ग्रामीण सरस - दहावीच्या निकालाची तालुकानिहाय टक्केवारी पाहिल्यास यात अर्जुनी मोरगाव तालुका सरस ठरला आहे. या तालुक्याचा एकूण निकाल ९९.२६ टक्के लागला आहे. तर उर्वरित तालुक्यांचा निकालसुध्दा सरासरी ९७ टक्के आहे. तर शहरी भागातील शाळांचा सरासरी निकाल ९६ टक्के आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील शाळा सरस ठरल्या आहेत.