अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:08 AM2018-02-10T00:08:47+5:302018-02-10T00:09:06+5:30

देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज आहे,.....

The need for eradication of superstitions is the need of time | अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज

Next
ठळक मुद्देचव्हाण : विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोग सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज आहे, असे विचार प्रबोधनातून एस.एस. चव्हाण यांनी व्यक्त केले.
इसापूर-इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एस. झोडे होते. मार्गदर्शक एस.एस. चव्हाण व अतिथी म्हणून डी.एम. नाकतोडे, बी.के. मस्के, आर.एस.धोटे, पी.यू. मेहंदळे, एम.एन. डोंगरे उपस्थित होते.
या वेळी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करुन दाखविले. कोंबडीला संमोहित करणे, अग्नी प्रज्ज्वलित करणे, नारळातून वस्तू कढून दाखविणे, जळता कापूर तोंडात घालणे, चिठ्ठीतील नावे न पाहता वाचून दाखविणे, भूत, भानामती, मंत्रतंत्र, जादू या सर्व गोष्टी निरर्थक आहे. मंत्राने किंवा जादूने कोणालाही मारता येत नाही. जो कोणी मांत्रिक मंत्राने आपला पापड मोडून दाखवेल त्याला अंनिशकडून २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. पण आतापर्यंत कोणीही समोर आलेला नाही. याचाच अर्थ कोणीही जादूटोण्यावर विश्वास ठेवू नये, बुवा, बापू, महाराज यापासून सावध रहावे.
प्रास्ताविकातून अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता समितीची भूमिका, तिची उद्दिष्टे व कार्याविषयीची माहिती प्रा.बी.डी. फुलकटवार यांनी दिली. आभार एस.एस. शहारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.एम. डोंगरवार, डी.डी. तोंडरे, आर.एल. जाधव, पी.टी. धोटे, डी.सी. लंजे, पी.आय. पुराम यांनी सहकार्य केले.

Web Title: The need for eradication of superstitions is the need of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.