नागपूर-बिलासपूर रेल्वे प्रवासात प्रचाराची नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:29 PM2019-03-22T21:29:14+5:302019-03-22T21:29:52+5:30
नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे. जणू प्रवासी रेल्वेगाडी त्यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे माध्यम झाले आहेत.
नागपूर-रायपूर व बिलासपूर दरम्यान दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रवाशादरम्यान अनेकजण राजकीय विषयावर चर्चा करतात. गत आठ दिवसांपासून एका राजकीय पक्षाचे समर्थक नागपूर रेल्वेस्थानकावरून प्रवाशी गाडीत बसतात. चार ते पाच जणांचे हे पथक प्रवासादरम्यान निवडणुकीची चर्चा करतात. त्यानंतर एका विशिष्ट पक्षाची विकासात्मक कामे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रभाव सांगनू प्रवाशांना बोलते करतात. प्रवासांची व्यक्तीगत माहिती घेतात. संबंधित खासदार किती सक्रीय आहे, याची माहिती घ्यायला हे पथक विसरत नाही.
३० ते ४० वयोगटातील असलेले हे तरूण प्रथम हिंदीतून संवाद साधतात. सहज वाटणारा हा संवाद आचारसंहितेत बसतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचारासाठी ही नवीन शक्कल लढविण्यात आली असून आपली ओळख पटू नये म्हणून दर दोन तीन दिवसांनी पथकातील सदस्य बदलत असल्याची माहिती आहे.
आता ही चर्चा आचारसंहितेत बसते की भंग करते असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.