पीक पेरा भरण्याकरिता शासनाने ई-पीक पाहणी हा मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलेला आहे. शेतकऱ्यांना आता आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले-स्टोअर मधून हा ॲप डाऊनलोड करावा लागेल. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची नोंद करावी लागेल. एका अँड्रॉइड मोबाइल फोनमध्ये २० खातेदारांची नोंद करता येईल. या पिकाची नोंद १५ सप्टेंबरच्या आत पूर्ण करावयाची आहे, अन्यथा नोंद होणार नाही, अशी तंबीच महसूल विभागाने दिली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना अँड्रॉइड मोबाईल असलेल्यांकडे किंवा शेजाऱ्यांच्या दाढीला हात लावावा लागेल.???? अँड्रॉइड मोबाईलअभावी पीकपेऱ्याची नोंद होणार की नाही? यात शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होणार आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देऊन तलाठ्याने व कृषी विभागाने या पीकपेऱ्याची नोंद करावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.
आता शेतकऱ्यांना स्वत:च भरावा लागणार पीक पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:28 AM