लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२३) पुन्हा पाच जणांचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली असून पुन्हा ८० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील आठ पैकी सात तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात सध्या स्थितीत सर्वाधिक २६ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजुर्नी मोरगाव तालुका कोरोनाचा हाटस्पॉट होत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात आढळलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबई आणि पुणे येथून आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून आत्तापर्यंत एकूण ५८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५०३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल शनिवारपर्यंत प्राप्त झाला असून यापैकी ३९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ८० स्वॅब नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आठपैकी सात तालुक्यांना कोरोनाचा विळखामागील ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मागील चार दिवसात हा आकडा ३९ वर पोहचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता शहराऐवजी ग्रामीण भागात वाढत आहे.त्यामुळे उपाययोजना करताना प्रशासनाची सुध्दा तारांबळ उडत आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सात तालुक्यात कोरोनाने विळखा घातला असून उर्वरित एक तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.जिल्ह्यातील आठ कंटेनमेंट झोनकोरोना बाधीत रुग्ण आढळलेल्या क्षेत्रात जिल्हा प्रशासनाने आठ कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. अर्जुनी मोरगाव तालुका अरु णनगर, करांडली, सडक अर्जुनी तालुका तिडका, रेंगेपार सलईटोला, गोंदिया तालुका गर्रा, गोरेगाव तालुका गणखैरा, सालेकसा तालुका धनसुवा या आठ क्षेत्राचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३९; पुन्हा पाच रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:57 PM
गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२३) पुन्हा पाच जणांचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली आहे.
ठळक मुद्दे५०३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त