गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीला पूर्णपणे ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. बुधवारी (दि.१५) कोरोनाबाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती.
काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ३११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०३ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १०८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,५०,४२० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,३०,३०२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २,२०,११८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२११ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले, तर ४०,५०२ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने रुग्ण बरे होण्याचा दर ९९.२७ टक्के आहे.
..................
लसीकरणाचा नऊ लाखांचा टप्पा पूर्ण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. जिल्ह्यातील १२५ केंद्रावरून सध्या लसीकरण मोहीम सुरू असून, आतापर्यंत ९ लाख ८ हजार ७०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जवळपास ७२ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, लसीकरणात जिल्हा आघाडीवर आहे.