अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या यादीतील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी त्यांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकºयांना मिळणार आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकºयांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहान म्हणून देण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील एकूण २७ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी २१ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. तर ५ हजार ३६७ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तर जवळपास ४५७९ खात्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.यानंतर हे सर्व अर्ज शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात येईल. त्यानंतर ते स्वीकृत होवून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. मात्र यासाठी थोडा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची गरज आहे. मात्र जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत त्यांनी जुन्या पीक कर्जाची रक्कम स्वत: भरल्यास त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. तर जुन्या पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ मे पर्यंत आहे. मुदतीत कर्जाची परतफेड केली नाही तर शेतकरी थकबाकीदार होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी झाली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेने जे शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहेत. त्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या हितार्थी घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारावर उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठीच बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.५६ कोटी पीक कर्ज वाटपशेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाºया गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकºयांना आत्तापर्यंत ५६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.पीक कर्ज वाटपाची टक्केवारी ४० टक्के असून राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ३ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.तर पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने आघाडी घेतली आहे.कर्जमुक्तीचा लाभ देण्यातही आघाडीमहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २७ १२८ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ आत्तापर्यंत देण्यात आला आहे. यात सर्वाधिक खातेदार शेतकरी हे जिल्हा बँकेचे असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६७ कोटीहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.खरीप हंगाम तोंडावर असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशांची अडचण जावू नये यासाठी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या आणि यादीत समावेश असलेल्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.- राजेंद्र जैन,अध्यक्ष जिल्हा बँक गोंदिया.
यादीत नावे असणाऱ्यांनाच मिळणार पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकºयांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहान म्हणून देण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील एकूण २७ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी २१ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.
ठळक मुद्देसाडेचार हजार शेतकऱ्यांना लाभ : जिल्हा बँकेचा निर्णय, खरिपासाठी होणार मदत