लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील काही गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील परसवाडा व कटंगीकला येथे कोरोना पॉझिटिव्ह प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दोन्ही गावे व तेथील परिसराला कंटोनमेंट आणि बफर क्षेत्र म्हणून उपविभागीय दंडाधिकारी वंदना सवरंगपते यांनी घोषीत केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर भागात पसरु नये यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्राम कटंगीकला येथील वॉर्ड क्रमांक-२ आणि ४ मधील पूर्वेस ग्रामपंचायत रोडवर रियाज तुर्क यांच्या घरापर्यंत तर पश्चिमेस ग्रामपंचायत रोड, कटंगी रेल्वे फाटकापर्यंत, उत्तरेस मस्जिदपासून आणि दक्षिणेस सुभाष चौक ते तिलकचंद वऱ्हाडे यांच्या घरापर्यंत कंटोनमेंट क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तर ग्राम गोंडीटोला, कटंगीटोला, कटंगीकला वॉर्ड क्रमांक १ आणि ५ आणि विजयनगर हे बफर क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.ग्राम परसवाडा हे कंटोनमेंट झोन तर झिलमिली, चिरागटोला, मोगरा व बिरसी हे बफर क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.कंटोनमेंट क्षेत्रांमध्ये येणारे व जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे. या भागातील सीमा आगमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांना प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना या क्षेत्रामध्ये येण्यास पूर्तता प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालय ओळखपत्राच्या आधारे ये-जा करण्यास मुभा देण्यात आली आहे.आवश्यक तातडीचे वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी सबंधीत खासगी डॉक्टर, नर्स, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका, जीवनावश्यक सेवा पुरविणारे व्यक्ती तसेच जीवनावश्यक वस्तूंशी संबंधीत सेवा कंटोनमेंट क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात येणारे प्रवेश ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
परसवाडा, कटंगीकला कंटोनमेंट, बफर क्षेत्र घोषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM
ग्राम परसवाडा हे कंटोनमेंट झोन तर झिलमिली, चिरागटोला, मोगरा व बिरसी हे बफर क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.कंटोनमेंट क्षेत्रांमध्ये येणारे व जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे. या भागातील सीमा आगमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांना प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना या क्षेत्रामध्ये येण्यास पूर्तता प्रतिबंध करण्यात आला आहे.
ठळक मुद्देगावातील आवागमन बंद : कोरोना प्र्रतिबंधक उपाययोजना