लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय महाविद्यालयात (मेडिकल) कार्यरत डॉक्टरांचे वेतन थकले आहे. यासंबंधी डॉक्टरांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या व्हाट्सअॅपवर निवेदन पाठविले होते. याची खा.पटेल यांनी त्वरीत दखल घेत बुधवारी (दि.२२) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी डॉक्टरांच्या थकीत वेतनाचा मुद्दा त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांचा मागील सहा महिन्यांपासूनचा थकीत वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.येथील मेडिकलमध्ये कार्यरत डॉक्टरांना मागील सहा महिन्यापासून वेतन न मिळल्याने ते अडचणीत आले होते. यासाठी डॉक्टरांचा मागील सहा महिन्यापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. वेतन मिळत नसले तरी हे डॉक्टर मेडिकलमध्ये नियमित सेवा देत आहेत. खा. पटेल यांच्यामुळे आता त्यांची समस्या मार्गी लागणार आहे. येथील शासकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाचे स्वॅब नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागतात. त्यामुळे त्याचा अहवाल प्राप्त होण्यास आणि पर्यायाने उपचार सुरू करण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेत खा.पटेल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून हा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांची समस्या खा. पटेल यांच्याकडे मांडली होती. यासंदर्भात त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करुन तेंदूपत्ता मजुरांचा मुद्दा देखील मार्गी लावला. माजी आ.राजेंद्र जैन यांनी रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचण होत असल्याची समस्या खा.पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्न देखील मार्गी लावण्याचे आदेश दिले. शहरातील गणेशनगर परिसरातील संचारबंदी विषयी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यावर त्वरीत तोडगा काढण्यास सांगितले.खा. पटेल मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात असून कोरोना आणि जिल्ह्यातील समस्यांबाबत ते अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधून आढावा घेत आहे. बुधवारी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
मेडिकलच्या डॉक्टरांच्या प्रश्नावर पटेल यांची आरोग्य मंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:00 AM
येथील मेडिकलमध्ये कार्यरत डॉक्टरांना मागील सहा महिन्यापासून वेतन न मिळल्याने ते अडचणीत आले होते. यासाठी डॉक्टरांचा मागील सहा महिन्यापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. वेतन मिळत नसले तरी हे डॉक्टर मेडिकलमध्ये नियमित सेवा देत आहेत. खा. पटेल यांच्यामुळे आता त्यांची समस्या मार्गी लागणार आहे.
ठळक मुद्देप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन : इतर विभागाच्या सचिवांशी केली चर्चा