इलेक्ट्रोपॅथी ही कमी खर्चात लाभ देणारी गरीबांची पॅथी

By admin | Published: January 15, 2016 02:38 AM2016-01-15T02:38:24+5:302016-01-15T02:38:24+5:30

इलेक्ट्रोपॅथी ही गरिबांची पॅथी असून कमी पैशात अधिक गुणकारी आहे. गावात डॉक्टर नसते तर प्रत्येक दिवसाला दोन-चार मृत्यू प्रकरण आढळले असते,...

Petopathy is a low cost beneficiary of electropathy | इलेक्ट्रोपॅथी ही कमी खर्चात लाभ देणारी गरीबांची पॅथी

इलेक्ट्रोपॅथी ही कमी खर्चात लाभ देणारी गरीबांची पॅथी

Next

दिलीप बन्सोड : तिरोडा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा
तिरोडा : इलेक्ट्रोपॅथी ही गरिबांची पॅथी असून कमी पैशात अधिक गुणकारी आहे. गावात डॉक्टर नसते तर प्रत्येक दिवसाला दोन-चार मृत्यू प्रकरण आढळले असते, असे मत तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आ. दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.
मेडिकल असोसिएशनद्वारे इलेक्ट्रो-होमोओपॅथीबद्दल जागृती निर्माण व्हावी, शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, इलेक्ट्रोपेथी ही गरिबांची पॅथी असल्याने जनतेमध्ये प्रसार व्हावा याकरिता तिरोडा समितीच्या वतीने इलेक्ट्रोहोमीओपॅथीचे जनक कॉन्सीजर मेटी यांच्या २०७ व्या जयंतीनिमित्त तिरोडा येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.के.जी. तुरकर होते. अतिथी म्हणून डॉ.सी.एच. भगत, डॉ.ओ.टी. भैरम, डॉ.जी.एस. बिसेन, डॉ. विनोद भगत, डॉ. रूपेश बांते, डॉ. रुपेश बांते, डॉ. शिशुपाल रहांगडाले, डॉ. फाल्गुन कटरे, डॉ. सिध्दार्थ खोब्रागडे, नवेझरीचे डॉ. चान्सी, डॉ.एस.बी.येवले आणि डॉ.के.बी. राणे उपस्थित होते.
यावेळी इलेक्ट्रोपॅथीचे जनक मेटी यांच्या कार्याबद्दल आणि आविष्काराबद्दल तसेच अनेक संघर्ष, धरणे आंदोलन केल्यावरसुध्दा नेते व राजकारणी लोकांच्या असहयोगाबद्दल सी.एस. भगत, डॉ.पी.एन. भगत, डॉ.एस.बी. येवले, डॉ.के.जी. तुरकर, बालाघाटचे डॉ. दीक्षित, डॉ. मुक्ता अग्रवाल व के.बी. राणे यांनी मार्गदर्शन केले.
सन २००६ पूर्वी इलेक्ट्रोपॅथीचे डॉक्टर त्रस्त होते. त्यांना बोगस डॉक्टर संबोधले जात होते. परंतु औरंगाबाद आणि मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने काहिसा न्याय मिळाला. तरीपण आपली बाजू मांडणारे नेते व राजकारणी नसल्याने पूर्ण न्याय मिळत नसल्याचे मत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केले. यापूर्वी आमदार राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल आणि हेमंत पटले यांनी सहयोग दिले होते, असेही डॉक्टर म्हणाले. बन्सोड पुढे म्हणाले, पाण्यापासून संशोधन करणाऱ्या कॉनसीजर मेटी यांनी इलेक्ट्रोपॅथीचा आविष्कार केला. यातून गरिबांना कमी पैशात योग्य सेवा मिळत आहे. याला शासनाने मान्यता देऊन ठिकठिकाणी प्रचार करणे गरजेचे झाले आहे. लोकशाहीत व मंत्रिमंडळात या व्यवसायाशी संबंधित नेते किंवा कार्यकर्ते जाणारे नसल्याने आणि मेडीकल कॉन्सीलचे डॉक्टर या पॅथीला दाबून ठेवत आहेत. या पॅथीला समोर आणले तर आपला व्यवसाय कमी पडेल, अशी यांना भीती आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला २०० च्या वर डॉक्टर उपस्थित होते. संचालन डॉ.गणेश बिसेन व आभार ओमप्रकाश भैरम यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Petopathy is a low cost beneficiary of electropathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.