आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:38+5:302021-05-06T04:30:38+5:30

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा ...

Police take care of health | आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

आरोग्याची काळजी वाहत पोलीस करतात जीवाचे रान ()

Next

नवेगावबांध : ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस प्रशासन रखरखत्या उन्हात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. संचारबंदीचे कुठेही उल्लंघन होऊ नये, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, आरोग्यासंबंधित अत्यावश्यक सेवा वगळून इतर अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. ती वेळ पाळली जावी, त्याचे उल्लंघन होऊ नये, परवानगी नसलेली दुकाने सुरू नसावीत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख, पोलीस कर्मचारी उन्हातान्हाची पर्वा न करता, वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी, संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीच्या काळात काही टवाळखोर गावात विनाकारण फिरतात, तर काही रस्त्याच्या कडेला बसून राहतात. त्यांच्यावर वचक बसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे परिसरात वाढती कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. नागरिकांनीही संचारबंदीचे उल्लंघन न करता पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी कळविले आहे.

.....

जि.प.शाळेत गृहविलगीकरण

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रांवर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी ग्रामवासीयांना केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्यासाठी प्रशासन येथील ग्रामवासीयांना वारंवार आवाहन करीत आहे. आत्ता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

............

गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवा

कोरोनाचा वाढता संसर्ग व होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेसुद्धा दवंडीद्वारे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंधांचे पालन करण्यास नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ही वेळ अपुरी पडत असून, ती वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. दुकानदारांनाही पुरेसा वेळ मिळत नाही. चार तास दुकाने सुरू राहतात. ही अपुरी वेळ असल्यामुळे, सध्या असलेली ही वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी.

Web Title: Police take care of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.