मानवी चुकांमुळे विजेचा धोका

By admin | Published: January 14, 2016 02:26 AM2016-01-14T02:26:38+5:302016-01-14T02:26:38+5:30

विजेपासून होणारे अपघात : विद्युत सुरक्षा सप्ताहात प्राचार्य गजभिये यांचे मार्गदर्शन

Power risk due to human errors | मानवी चुकांमुळे विजेचा धोका

मानवी चुकांमुळे विजेचा धोका

Next

गोंदिया : विजेची उपकरणे हाताळताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. विजेपासून होणाऱ्या अपघातास मानवी चुका कारणीभूत असतात, असे मत शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.ई. गजभिये यांनी व्यक्त केले.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालय गोंदियाच्या वतीने सुभाष गार्डन येथे विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य गजभिये बोलत होते.
अतिथी म्हणून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्रीकांत सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन गोंदियाचे अध्यक्ष हुकुमचंद अग्रवाल उपस्थित होते.
गजभिये पुढे म्हणाले, आपण ज्या परिसरात राहतो त्या भागातील नागरिकांना व शेजाऱ्यांना विजेचे अपघात टाळण्याबाबत जागृत करण्याचे काम प्रत्येकाने करावे. आपल्या घरातील विद्युत उपकरणे सुव्यवस्थीत असल्याची खात्री करावी. अर्थिंग योग्यप्रकारे लावावे. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.
वाकडे म्हणाले, वीज ही चुकीने हाताळणाऱ्याला क्षमा करीत नाही. ती भेदभावसुध्दा करीत नाही. अत्यंत काळजीपूर्वक वीज उपकरणे हाताळल्यास विजेपासून होणारे अपघात टाळता येतात. मानांकन असलेली, आयएसआय ट्रेडमार्क असलेली आणि शासनमान्य असलेली उपकरणेच खरेदी करावी. त्यामुळे विजेपासून होणारे अपघात टाळता येतात.
सावळे म्हणाले, घरी वीज वापर करताना वायरिंग, अर्थिंग योग्य असल्याची खात्री करावी. कारखान्यात होणारे अपघात कामगारांच्या हलगर्जीपणामुळे होतात. त्यामुळे यास माणसाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. विजेची उपकरणे हाताळणाऱ्या व्यक्तींनी काळजीपूर्वक हाताळावी, असे सांगितले.
खडसे यांनी मार्गदर्शनातून विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे काम शालेय विद्यार्थी प्रभावीपणे करू शकतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा विषयक संदेश घरोघरी पोहोचविण्याचे काम होणार असल्याचे सांगितले. अग्रवाल यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
विद्युत निरीक्षक खापर्डे यांनी प्रास्ताविकातून विजेमुळे सार्वजनिक ठिकाणी व घरी होणारे अपघात टाळण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करावी याबाबत माहिती दिली. तसेच विद्युत सुरक्षा सप्ताह दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
कार्यक्रमाला जिल्हा कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी रावत, लिल्हारे, सय्यद, राजू फुंडे, राजेश नानुरे, आगलावे, लांजेवार, पाऊलझगडे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी, नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय खापर्डे यांनी उपस्थिताना सुरक्षा प्रतिज्ञा दिली. संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुहास धामणकर यांनी केले. आभार विद्युत निरीक्षक दिनेशचंद्र देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Power risk due to human errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.