कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची ५० लांखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:16+5:30
राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संपूर्ण जगभरात कोरोनामुळे महामारीचे संकट निर्माण झाले आहे. तर महाराष्ट्रात सुध्दा दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासन व गोंदिया आणि भंडारा जिल्हा प्रशासन आवश्यक उपाय योजना करीत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाविरुध्द लढण्यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची केली आहे. यासंबंधीचे पत्र देखील त्यांनी गोंदिया व भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
संपूर्ण देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोना विरुद्ध लढा देत आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासन आणि प्रशासनसमोर देखील पेच निर्माण झाला आहे.
राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
कोरोना विरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे.त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
देश आणि राज्यावर आलेल्या कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक, धार्मिक, सेवाभावी संस्थांनी सुध्दा आवश्यकता पडल्यास मदतीसाठी पुढे यावे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात आहे. मात्र याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस व सफाई कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे सुध्दा त्यांनी आभार मानले आहे.
विशेष म्हणजे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील प्रत्येक घडामोंडीवर माजी आ.राजेंद्र जैन हे लक्ष ठेवून असून त्यांनी सुध्दा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे म्हटले आहे.