मान्सूनपूर्व सफाई थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:11 PM2018-06-04T22:11:14+5:302018-06-04T22:11:29+5:30
रविवारच्या (दि.३) पावसाने पावसाळा सुरू होत असल्याचे संकेत दिले असले तरी नगर परिषेदेचे मान्सूनपूर्व सफाई अभियान अद्यापही थंडबस्त्यात आहे. जेसीबी, पोकलँड मशीनसह मनुष्यबळ पुरवठ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला आता सुरूवात केली असून बुधवारी (दि.६) निविदा उघडली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे यंदाचे मान्सूनपूर्व सफाई अभियान थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रविवारच्या (दि.३) पावसाने पावसाळा सुरू होत असल्याचे संकेत दिले असले तरी नगर परिषेदेचे मान्सूनपूर्व सफाई अभियान अद्यापही थंडबस्त्यात आहे. जेसीबी, पोकलँड मशीनसह मनुष्यबळ पुरवठ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला आता सुरूवात केली असून बुधवारी (दि.६) निविदा उघडली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे यंदाचे मान्सूनपूर्व सफाई अभियान थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे.
पावसाळ््या पूर्वी शहरातील पाणी वाहून नेणारे मोठे नाले नगर परिषदेकडून जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून साफ केले जातात. जेसीबीद्वारे या नाल्यांतील गाळ व कचरा काढून त्यांना मोकळे केले जाते. जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी वाहून जावे व कुणाच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये. यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सून पूर्व सफाई अभियान सुरू केले जाते. यंदा मात्र आता पावसाळा तोंडावर आला असूनही अद्याप मान्सूनपूर्र्व सफाई अभियान राबविले जाते.
मात्र यंदा नगर परिषदेचे मॉन्सूनपूर्व नियोजन बिघडल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व सफाई अभियानातंर्गत मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी जेसीबी व पोक लँड भाड्यावर घेतले जाते. जेथे या मशिन काम करीत नाही तेथे मजूर लावून सफाई करावी लागते. अशात मशिनसह मनुष्यबळ पुरवठ्यासाठी निविदा काढली जाते. यंदा मात्र लोकसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रकियेत अडचण निर्माण झाली होती.
परिणामी अद्याप सफाई अभियान निविदा प्रक्रियेत अडकले आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून रविवारी (दि.३) रात्री शहरातही पावसाच्या सरी बरसल्या व पावसाळ्याला सुरूवात झाल्याचे संकेत दिले.
७ जूनपासून मान्सूनपूर्व सुरू होत असताना आता फक्त दोन दिवस उरले आहेत. अशात येत्या बुधवारी (दि.६) जेसीबी-पोकलँड व मनुष्यबळ पुरवठ्याची निविदा उघडली जाणार आहे. त्यानंतर सफाई अभियानाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व सफाई अभियान थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे.
फेरनिविदा काढण्याची वेळ
नगर परिषदेने मान्सूनपूर्व सफाईसाठी १९ एप्रिल रोजी निविदा काढली होती. ही निविदा प्रशासकीय कारणांने रद्द करावी लागली होती. त्यानंतर २१ मे रोजी फेरनिविदा काढण्यात आली. आता बुधवारी (दि.६) निविदा उघडली जाणार आहे. या निविदेत जेसीबी व पोकलँड व मनुष्यबळ मागविले जाणार आहे. ही निविदा उघडल्यावरच काय ते स्पष्ट होणार असून त्यानंतरच सफाई अभियानाला सुरूवात होईल. पावसाळ्यात सफाई करणे कठीण असून अशात सफाई अभियान थातूरमातूर उरकले जाण्याची शक्यता आहे.