आताच्या पिढीला शिवरायांच्या विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:36+5:302021-02-20T05:25:36+5:30

बाराभाटी : शिलवान कर्तृत्ववान असा राजा फक्त शिवाजी महाराज आहेत. या राजाच्या कार्यकाळाचा अभ्यास केला, तर आताच्या भावी पिढीला ...

The present generation needs the thoughts of Shivaraya | आताच्या पिढीला शिवरायांच्या विचारांची गरज

आताच्या पिढीला शिवरायांच्या विचारांची गरज

googlenewsNext

बाराभाटी : शिलवान कर्तृत्ववान असा राजा फक्त शिवाजी महाराज आहेत. या राजाच्या कार्यकाळाचा अभ्यास केला, तर आताच्या भावी पिढीला शिवरायांच्या विचारांची कर्तृत्वाची जाणीव करावी, असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य प्रीतम रामटेके यांनी केले.

याप्रसंगी रामू कुंभरे सरपंच, ज्ञानेश्वर गेडाम उपसरपंच, कैलास आळे ग्रा.पं. सदस्य, के.आचले ग्रामसेवक, खोब्रागडे, सोनकुसरे, भाग्यवान डोंगरे, राहुल रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन मेश्राम यांनी केले, तर आभार सूरज रामटेके यांनी मानले.

..........

संजय गांधी हाय. व कनिष्ठ महाविद्यालय

गोरेगाव : तालुक्यातील तेढा येथील संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.बी.गोस्वामी होते. शाळेचे पर्यवेक्षक बी.एन. बनसोडे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. प्राचार्य यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पर्यवेक्षक यांनी शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभार यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन ओ.आय. रहागडाले यांनी केले, तर आभार एल.आर. बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी धारगावे, कटरे, मुंगमोडे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: The present generation needs the thoughts of Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.