कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. कार्यक्रमाची सुरुवात कुलकर्णी व उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. दरम्यान, स्पर्धेतील विजेत्या संघाचा ट्रॉफी, पुरस्कार व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर साहित्य वाटप करण्यात आले. तसेच रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण ८४ मुला-मुलींनी रक्तदान केले. कार्यक्रमात गावातील नागरिक, उपस्थित मान्यवर, बिजेपार पोलीस कॅम्पचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. रमेश सुगंध, डॉ. पल्लवी गेडाम, लता डोनोडे, वंदना काळे, टिना चुटे, प्रमिला दोनोडे, शामलाल दोनोडे, बिजेपारचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे, पोउपनि पांडुरंग मुंडे, पोउपनि दाते तसेच सशस्त्र दूरक्षेत्र बिजेपार येथील जिल्हा पोलीस व आय. आर. बीय.चे पोलीस अंमलदार उपस्थित होते.