जनता दरबारातून जाणल्या समस्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:41+5:302021-09-02T05:02:41+5:30

अर्जुनी : अर्जुनी - मोरगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे झाली. कोरोना महामारीमुळे नगरपंचायत वर प्रशासकराज आहे. शहरात ...

Problems learned from Janata Darbar () | जनता दरबारातून जाणल्या समस्या ()

जनता दरबारातून जाणल्या समस्या ()

Next

अर्जुनी : अर्जुनी - मोरगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे झाली. कोरोना महामारीमुळे नगरपंचायत वर प्रशासकराज आहे. शहरात घरकूल, आरोग्य, शौचालय, विविध मूलभूत सुविधा, अंगणवाडी दुरुस्ती, घरकूल भूखंड वाटप, पाणीपुरवठा यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत.

या समस्यांना मार्गी लावण्यासाठी आ. चंद्रिकापुरे यांनी जनता दरबाराचे आयोजन नगरपंचायत भवनात केले. या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, सुशांत अरु, प्रफुल गाबैल उपस्थित होते. सिंगल टोली आणि बरड टोली येथील नागरिकांना अतिक्रमणाच्या जाचक अटीमुळे घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात याच परिसरातील नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळाला. मात्र नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आणि नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणे बंद झाले. या रहिवाशांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदारांसमोर स्थानिक समस्यांचा पाढा वाचला. आमदारांनी घरकूल, प्रधानमंत्री आवास योजना, भुखंडाचे, प्रलंबित वनहक्क पट्टे संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्याधिकारी जाधव यांना दिले. जिल्हा सचिव राकेश जायस्वाल, शहर अध्यक्ष महेंद्र शहारे, आर.के. जांभुळकर, माजी नगरसेविका प्रज्ञा गणवीर, नाना शहारे, नगरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Problems learned from Janata Darbar ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.