वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:31+5:302021-09-12T04:33:31+5:30
देवरी : वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली असून यासाठी वारकरी साहित्य ...
देवरी : वारकरी साहित्य कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली असून यासाठी वारकरी साहित्य कलाकारांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
देशात कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका वारकरी कलावंतांना बसला आहे, कारण वारकरी संप्रदायातील लोक समाजात धार्मिक उपक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, प्राणायाम, पोवाडे, भजन, कीर्तन करीत असून ते प्रदीर्घ काळापासून बंद असल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची पाळी आली आहे. तरी या संकट काळात मुख्यमंत्र्यांनी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, टाळकरी या सर्व कलावंतांना मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नरेश कुंभलकर, गरीबदास मडावी, गोपाल प्रधान, धनलाल कुंभलकर, सुरेश उपरीकर, उमेश वैरागडे, टिकाराम खोटेले, मथरा मेंढे, प्रेमलाल मरस्कोल्हे, नंदलाल पंधराम, अशोक मडावी, किमन मोहनकर, गुणवंता शेंडे आदी उपस्थित होते.