लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी २८ सप्टेंबरपासून विविध उपाय योजना केल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या आत प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी केवळ एकच प्रवेशव्दार सुरू ठेवले आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होऊन रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र या सुरक्षा व्यवस्थेच्या नावावर प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ठिक आहे मात्र रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेले मार्ग बंद करणे योग्य नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाला अ श्रेणीचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. दररोज ४० हजार प्रवाशी या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. तर दीडशेवर प्रवाशी आणि मालगाड्या या रेल्वे स्थानकावरुन दररोज धावतात. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याच दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २८ सप्टेंबरपासून करण्यात आली. मात्र यासर्व प्रकाराची माहिती रेल्वे प्रशासनाला नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवेश करणारे सर्व पादचारी पुलाचे मार्ग बंद करुन केवळ गोरेलाल चौकाकडील मार्ग सुरू ठेवला. त्यामुळे कुडवा, रामनगर, बालघाटकडून येणाऱ्या प्रवाशांना फेरा मारून आल्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान या प्रकारामुळे बरेचदा गाडी सुटत असल्याने अनेक प्रवाशांना आपल्या नियोजित ठिकाणी पोहचणे शक्य होत नसल्याने त्यांनी याप्रकारावर रोष व्यक्त केला. प्रवाशांचा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न योग्य आहे. मात्र यासाठी प्रवाशांना वेठीस धरण्याचा हा प्रकार योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या. रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांना होणार त्रास टाळण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.फुकट्या प्रवाशांची संख्या झाली कमीरेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर २८ सप्टेंबरपासून विशेष सुरक्षा व्यवस्था आणि काही उपाय योजना केल्या आहेत. यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झाली असून प्लेटफार्म तिकीट आणि दैनदिन तिकीट विक्रीत सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे विभागाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने रेल्वेचे अधिकारी खूश आहेत.असामाजिक तत्वांवर वचकगोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसरातील असामाजिक तत्वांचा वावर कमी झाला आहे. शिवाय या परिसरातील भिकाºयांची संख्या सुध्दा कमी झाल्याचे चित्र आहे.प्लेटफार्म तिकीट विक्रीने वाढले उत्पन्नगोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज ३५० प्लेटफार्म तिकीटांची विक्री होत होती.मात्र जेव्हापासून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.तेव्हापासून प्लेटफार्म तिकीटत विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. २८ सप्टेंबरपासून दररोज ७५० वर प्लेटफार्म तिकीटांची विक्री होत आहे. तर फुकट्या प्रवाशांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात घटल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची मते जाणून घ्यावीगोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था देण्याला आणि इतर उपाय योजना करण्याला प्रवाशांचा विरोध नाही. मात्र यासाठी एकदा प्रवाशांची मते विचारात घेऊन उपाय योजना करण्याची मागणी प्रवाश्यांनी केली आहे.
रेल्वेचे उत्पन्न वाढले मात्र प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 6:00 AM
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याच दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २८ सप्टेंबरपासून करण्यात आली.
ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : अनेक मार्ग बंद केल्याने प्रवाशांना मारवा लागतो फेरा