जातीधर्माच्या वर उठून आत्मिक भाव ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 12:58 AM2017-03-07T00:58:40+5:302017-03-07T00:58:40+5:30

ईश्वराने आता कलयुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरित होवून राजयोगाची शिक्षेने सर्वांना पावन करीत आहे.

Raise the spiritual values ​​of casteism! | जातीधर्माच्या वर उठून आत्मिक भाव ठेवा!

जातीधर्माच्या वर उठून आत्मिक भाव ठेवा!

Next

बी.के. रूख्मिणी : गोंदियात बह्मकुमारींचे सर्वधर्म संमेलन उत्साहात
गोंदिया : ईश्वराने आता कलयुगाच्या शेवटी पृथ्वीवर अवतरित होवून राजयोगाची शिक्षेने सर्वांना पावन करीत आहे. शस्त्रांच्या सांगण्यानुसार सतयुगात एक धर्म एक भाषा एक राज्य होते, तेच पुन्हा होत आहे. आपण सर्वांनी मिळून एक होवून त्या निराकार ज्योतिस्वरूपाचे ज्ञान धारण करून आता भारताला पुन्हा स्वर्ग बनवायचे आहे. धर्म जातीच्या वर उठून आत्मिक भाव ठेवण्याचे व मिळून प्रेम, एकता, सद्भावना समाजात पसरवावे, असे राजयोगिणी बी.के. रूख्मिणी म्हणाल्या.
विश्व शांती व धार्मिक एकतेसाठी ब्रह्मकुमारीजद्वारे सर्वधर्म संमेलन पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पार पडले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होत्या. उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिथी म्हणून सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
यात सर्व धर्मांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यात मौलाना शब्बीर अहमद अशरफी, फादर एच. हॅरी, ज्ञानी किरणपालसिंह, गायत्री परिवाराचे गोविंद येडे, विनोद जैन, बौद्धाचार्य एन.एल. मेश्राम उपस्थित होते. तसेच बह्मकुमारीजकडून राजयोगी बी.के. नारायणभाई, राजयोगिनी बी.के. रूख्मिनी दीदी, राजयोगिनी बी.के. रत्नमाला दीदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात राजयोगी बी.के. नारायणभाई म्हणाले, संबंधात संतुलन व उत्कृष्टता यांचा आधार मनुष्यास आत्मासह परमात्माबरोबर मनबुद्धीने स्रेहयुक्त संबंधाचा संयोग, यालाचा राजयोग म्हणतात.
राजयोगाच्या नियमित अभ्यासाने आपले चिंतन, चरित्र, संस्कार व आचरण पवित्र, सभ्य, श्रेष्ठ व दैवी बनतो. शिवाय सकारात्मक परिवर्तनाच्या आधारावर सर्व समाज, पर्यावरण, प्रकृती, संस्कृती व सत्यतासुद्धा दैवी, सतोगुणी, सुखदाई व सतयुगी बनते, असे सांगितले.
ईश्वराचा मार्ग शांती, सद्भावना, एकता, प्रेम या तत्वांनी राहण्यातच आहे. हेच सर्व धर्मांचे सार आहे व राजयोगामुळे आपण सहजतेने ईश्वरासी संबंध जोडू शकतो. कार्यक्रमात सर्व धर्म स्थापकांना एका झाकीच्या माध्यमातून दाखविण्यात आले. सर्वांनी एकासोबत नृत्य करून सर्वांना भावविभोर करून सोडले. शेवटी नारायण भाई यांनी आपसी मेलमिलाप ठेवण्याची प्रतिज्ञा वदवून घेतली.
संचालन बी.के. विनोद हरिणखेडे, त्रिरत्न बग्गा, शर्मिला पाल यांनी केले. आभार बी.के. वीणा यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Raise the spiritual values ​​of casteism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.