१० हजारांवर फुकटे : ४१,८१४ जणांकडून अवैध लगेज वाहतूकदेवानंद शहारे गोंदियादक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या दुर्ग ते नागपूर आणि कटंगी ते बल्लारशा रेल्वे स्थानकादरम्यान ७२ हजार ३३८ जणांना अवैधरित्या प्रवास करताना पकडण्यात आले. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत प्रवाशांकडून एक कोटी ८७ लाख ४१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रेल्वेचे टीटीसी आधीच पैसे घेवून प्रवाशांना सोडून देण्यासाठी बदनाम झाले आहेत. तरीही झालेली कारवाई थक्क करणारी आहे. टीटीसींनी योग्यरित्या तपासणी अभियान चालविले व आपले खिशे भरणे सोडले तर रेल्वेच्या उत्पन्नात आणखी मोठी भर पडू शकते, असे बोलले जात आहे.जानेवारी ते डिसेंबरदरम्यान १० हजार ३६८ प्रवाशांना विनातिकीट पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६९ लाख ६१ हजार ०९१ रूपयांची वसुली करण्यात आली. याशिवाय २० हजार १५६ प्रवाशी अनियमित तिकीट घेवून प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडे तिकीट तर होती, मात्र ती कमी अंतराची तिकीट घेवून दूर अंतरापर्यंत प्रवास करीत होते. त्यामुळे त्यांच्याकडून ८० लाख ६४ हजार २७४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशाच प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्यांनी ४१ हजार ८१४ अशा प्रवाशांना पकडले ज्यांच्याजवळ लगेज होते, मात्र त्या मोबदल्यात त्यांनी रेल्वेला कोणत्याही प्रकारचे लगेजचे भाडे दिले नव्हते. त्या प्रवाशांकडून ३७ लाख १५ हजार ६३६ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ७२ हजार ३३८ प्रवाशांकडून एक कोटी ८७ लाख ४१ हजार ००१ रूपयांचा दंड जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान वसूल करण्यात आला.
७२ हजार ३३८ प्रवाशांकडून १.८७ कोटींचा दंड वसूल
By admin | Published: January 15, 2016 2:30 AM