लाचखोर लिपिकाला ‘आम आदमी’चा हिसका
By admin | Published: January 16, 2016 02:05 AM2016-01-16T02:05:42+5:302016-01-16T02:05:42+5:30
वडिलांच्या मृत्यूनंतर आम आदमी विमा योजनेंतर्गत ३० हजार रुपये विमा रक्कम व कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे २० हजार रुपये मंजूर...
एसीबीकडून अटक : विम्याच्या रकमेसाठी तीन हजारांची मागणी
गोंदिया : वडिलांच्या मृत्यूनंतर आम आदमी विमा योजनेंतर्गत ३० हजार रुपये विमा रक्कम व कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे २० हजार रुपये मंजूर करण्यासाठी एका हातमजुराला ५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या, मात्र ३ हजार रुपये घेण्यास तयार झालेल्या तहसील कार्यालयाच्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१५) करण्यात आली. सतीश ज्ञानेश्वर चौधरी असे त्या लिपिकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, हितेश तांडेकर याच्ंया वडिलांच्या मृत्यूनंतर नियमानुसार आम आदमी विमा योजनेंतून त्यांना पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र लिपिक चौधरी याने आपण सर्वांकडूनच पाच हजार रुपये घेतो असे सांगून दोन्ही केसचे कागदपत्र तयार करून देण्याची तयारी दर्शविली होती.
परंतु तांडेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पंचासमक्ष चौधरी याने सदर लाचेची मागणी केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने चौधरीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (जिल्हा प्रतिनिधी)