चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:12+5:30

जानाटोला ते कारंजा राज्य महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे चिखलाच्या साम्राज्यमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

Road in the mud or mud in the road | चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल

चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल

Next
ठळक मुद्देगोरेगाव-गोंदिया राज्यमार्ग । वर्षभरानंतरही रस्त्याचे काम अर्धवट

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : विद्यमान सरकारकडून सध्या ग्रामीण आणि शहरी रस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम जोरात सुरू आहे. रस्त्यांअभावी नागरिकांची होणारी गैरसोय टळावी हा या मागील उद्देश आहे. मात्र सार्वजनिक विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे गोेरेगाव-गोंदिया हा १४ किमीचा रस्ता म्हणजे या मार्गावरील वाहन चालकांसाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरत आहे. रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हे कळण्यास मार्ग नाही.
जानाटोला ते कारंजा राज्य महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे चिखलाच्या साम्राज्यमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. १४ किमीचा रस्ता पार करण्यासाठी पंधरा मिनिटा ऐवजी तासभर लागत आहे. हे १४ किमीचे अंतर म्हणजे वाहन चालकांसाठी प्रसव वेदना देणारीच ठरत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मार्गाने नेत असतांना तो रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहचेल किवा नाही याबाबत शंकाच आहे.
जानाटोला ते गोंदिया राज्यमार्गाचे रस्ता बांधकामाचे कंत्राट जगताप कन्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. २०१८ च्या ऑगस्ट महिन्यात या रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली. १४.४०० किमीच्या या रस्त्याला एक वर्षाचा कालावधी लोेटूनही सदर रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. संथ गतीने सुरु असलेल्या या रस्ता बांधकामामुळे अनेक अपघातही झाले आहे. कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या नियोजनाअभावी केवळ चार ते पाच किमीचा रस्ता तो ही एकाच बाजूने तुकड्या-तुकड्यात पूर्ण झाला आहे.
जानाटोेला-गोंदिया नाकापर्यंत असलेल्या रस्ता बांधकामात जानाटोला ते पोलीस स्टेशन, ठाणा चौकाच्या पुढे ते कारंजापर्यंत रस्ता खोदण्यात आला.
विशेष म्हणजे रस्ता बांधकाम करतांना कंत्राटदाराने नियोजनबध्द न खोदता संपूर्ण रस्ता खोदला, त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराच्या नियोजनाअभावी आजघडीला पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण आहे. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर ये-जा करतांंना प्रथम चिखलाचा सामना करावा लागतो.चिखलामुळे अनेकांचा अपघात झाला आहे. तर रस्त्यावर चिखल वाहन चालक आणि पायी चालणाऱ्या अंगावर उडत असल्याने त्यांना आपल्यासोबत एक ड्रेस ठेवण्याची वेळ आली आहे.मात्र याशी सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीही घेणे देणे नाही.विशेष म्हणजे याच मार्गाने पालकमंत्री महोदय सुध्दा जातात. ते या विभागाचे राज्यमंत्री सुध्दा आहे. मात्र त्यांचे सुध्दा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात.

उन्हाळयात धूळ, पावसाळ्यात चिखल
एक वर्षापासून राज्य महामार्ग रस्ता बांधकामाचे काम सुरु आहे. उन्हाळ्यात या रस्त्यावर ये-जा करतांना वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत होता. आता वाहन चालकाचे कपड्याचे कलरच बदलून जाते. उडणाऱ्या धुळीमुळे काही अपघात सुध्दा घडले आहे. तर पावसाळ्यात चिखल अंगावर उडते.एकीकडे धुळ आणि दुसरीकडे चिखल असे दुहेरी संकट गेल्या एक वर्षापासून वाहनचालक आणि गोरेगाववासीयांना सोसावे लागत आहे.
रस्त्यामुळे वर्दळ झाली कमी
रस्त्यावर चिखल व धुळीमुळे अनेकांनी स्वत:च्या वाहनाने येणे बंद केले आहे. अनेकांनी बसने येणे सुरु केले आहे. तरी काही वाहन चालक गोरेगाववरुन झांजीया मोहगाव मार्गाने प्रवास करीत आहे.त्यामुळे अंतर्गत रस्तेही अधिकच्या वाहनाच्या वर्दळीमुळे खराब होत आहे. यातच अंतर्गत रस्त्याच्या वापरावर नागरिकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नियम बसविले धाब्यावर
मुख्य रस्त्याचे काम सुरू करताना त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी एका बाजुने पर्यायी रस्ता तयार करुन देणे संबंधित कंत्राटदाराचे काम आहे.मात्र जानाटोला-गोंदिया या १४ किमीच्या रस्त्याचे काम करताना हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसविण्यात आला आहे.दोन्ही बाजुने रस्ता खोदला असल्याने या मार्गावरुन वाहने काढणे म्हणजे एक दिव्यच आहे. वर्षभरापासून कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष जाऊ नये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Road in the mud or mud in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.