ऑनलाईन लोकमतगोंदिया : कर वसुलीसाठी आता जेमतेम १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने जास्तीत जास्त वसुलीसाठी धडपड सुरू केली आहे. असे असतानाच बाजार वसुलीसाठी पथकाने दुकानदारांवर आपला फास आवळला असून कर न दिल्यास दुकान सील पवित्रा घेतला आहे. गुरूवारी (दि.१५) कर वसुली पथक बाजारात दाखल झाले व त्यांच्या या पवित्र्याने दुकानदारांत दहशतीचे वातावरण दिसून आले.राजकीय अडसर येत असल्याने मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेची कर वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हती. परिणामी चालू मागणीपेक्षा थकबाकी जास्त अशी स्थिती निर्माण होऊन नगर परिषदेचे टार्गेट वाढतच गेले. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी यावर तोडगा म्हणून ‘कर द्या अथवा मालमत्ता सील’ हा प्रयोग अंमलात आणला. याचा नगर परिषदेला फायदा सुध्दा झाला. कधी नव्हे ती ५० टक्केच्यावर नगर परिषदेची कर वसुली होऊ लागली. मागील वर्षी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनीही हा प्रयोग अंमलात आणला. त्यामुळे मागील वर्षीही ५० टक्केच्यावर कर वसुली झाली होती. यंदा मात्र कर वसुलीत लेटलतिफी दिसून आली. आतापर्यंत फक्त ३० टक्केच कर वसुली झाली असल्याने मागील वर्षीचेही टार्गेट होते की नाही अशी स्थिती आहे. यामुळे मुख्याधिकारी पाटील यांनी कठोर पाऊल उचलत कर वसुली विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करीत सर्व कर्मचाºयांना जास्तीत जास्त कर वसुलीसाठी धारेवर धरल्याचे चित्र आहे. यासाठी विशेष पथक तयार करून त्यांना वाहन देण्यात आले आहे. यावर नगर परिषद प्रशासनीक अधिकारी राणे, प्रभारी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्यासह पथकातील अन्य सदस्यांनी बाजारात वसुली मोहीम राबविली. स्टेडियम समोरील नगर परिषदेच्या फुटपाथ दुकानांत कर वसुलीसाठी पथकाने धडक दिली. पथकाने वसुलीसाठी कठोर पाऊल उचलत थकबाकीदारांची दुकान सील करण्याचा इशारा दिल्याने दुकानदार नरमले व त्यांनी पैसे भरण्यास तयारी दर्शविल्याची माहिती आहे.गरज पडल्यास दुकाने सील करणारबाजारातील कित्येक दुकानदारांकडे थकबाकी असल्याने पथकाने यंदा कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. जास्तीत जास्त कर वसुलीसाठी दुकान सील करण्याची गरज पडल्यास तेही केले जाणार आहे. यासाठी शुक्रवारपासून पोलीस बळ सोबत घेतले जाणार असल्याचीही माहिती आहे. मात्र जास्तीत जास्त कर वसुली करण्यासाठी पथक सज्ज झाले आहे.
दुकानदारांवर फास आवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:56 PM
कर वसुलीसाठी आता जेमतेम १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने जास्तीत जास्त वसुलीसाठी धडपड सुरू केली आहे. असे असतानाच बाजार वसुलीसाठी पथकाने दुकानदारांवर आपला फास आवळला असून कर न दिल्यास दुकान सील पवित्रा घेतला आहे.
ठळक मुद्देकरवसुली मोहीम : बाजारात पथक दाखल