लोककल्याणासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:16 PM2018-03-11T21:16:55+5:302018-03-11T21:16:55+5:30

आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता सोशल मीडिया असा प्रवास माध्यमांचा आहे.

Social media should be used for the welfare of the people | लोककल्याणासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा

लोककल्याणासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा

Next
ठळक मुद्देप्रवीण महिरे : महामित्र उपक्रमांतर्गत संवाद सत्र

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता सोशल मीडिया असा प्रवास माध्यमांचा आहे. आज सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून लोककल्याणासाठी या मीडियाचा वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.९) चार संवाद सत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी एल.एस. बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार, प्रा. बबन मेश्राम, प्रा. कविता राजाभोज, अनुलोम संस्थेचे सतीश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
महिरे पुढे म्हणाले, महामित्रच्या माध्यमातून सोशल मीडियाचा एक प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास विकासाला गती मिळेल. सोबतच विवेकी समाज निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी, संवाद सत्रामागची भूमिका विशद केली.
संवाद परीक्षक म्हणून संजय भावे, सुनील पटले, अशोक शेंडे, प्रा. मेश्राम, डॉ. हुबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी चौबे, लेखाधिकारी बाविस्कर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक केदार यांनी तर निरीक्षक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढोणे, प्रा. राजाभोज, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मार्कंड, के.के. गजभिये यांनी काम पाहिले. आभार ठाकरे यांनी मानले.
महामित्रांना भेट वाटप
सत्रात सहभागी झालेल्या महामित्रांना संदर्भमूल्य असलेली महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक, लोकराज्य मासिक, आपली जिल्हा पुस्तिका, नववर्षाचे टेबल कॅलेंडर व सारस पक्षांची माहिती असलेली घडिपुस्तिका भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

Web Title: Social media should be used for the welfare of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.