अनाथ वधू-वरांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:45 PM2019-06-26T22:45:09+5:302019-06-26T22:46:06+5:30

जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.

Social message from orphan bride-groom wedding | अनाथ वधू-वरांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

अनाथ वधू-वरांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

Next
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : सामाजिक न्याय दिनी झाले विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.
गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी बादल व एकता या दोन्ही वधूवरांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र सात आठ वर्षांपूर्वीच हरपले. या अनाथ वधू-वरांनी समाज संदेश देणारी लग्नपत्रिका तयार करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला. लग्नपत्रिकेत प्रथमच मुलगा-मुलगी समान असून त्यांना समान लेखण्याचे आवाहन केले आहे. पुढे सेव्ह ट्रीच्या लोगोद्वारे झाडे व पाणी वाचविण्याचे आवाहन केले आहे. मानवाने नेत्रदान व रक्तदान करुन मदतीची परंपरा जोपासण्याचे तसेच स्वच्छ भारत अभियानाचा लोगोद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.
समाजसेवा, मूल्यशिक्षण, पर्यावरण यातून राष्ट्राचे रक्षण व मतदान हे कर्तव्य असून ते बजावण्याचे आवाहन केले आहे. सर्व शिक्षण मोहिमेच्या लोगोद्वारे शिक्षणाचे आवाहन करण्यात आले. देशाचे रक्षण करणारे जवान व पोषण करणारे किसान यांना मानवंदनापण लग्नपत्रिकेतून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लग्नात येताना वधू-वरांसाठी भेटवस्तू न आणता अनाथ मुलांसाठी नोटबुक आणण्याचे आवाहन करुन शिक्षणाला पुरस्कृत करण्यात आले होते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बादल व एकता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. शिवाय विवाह सोहळ्यातून बादल व एकता यांनी जाती पातीचे बंध तोडा भारत जोडा भारत जोडा असा संदेश दिला आहे.
कोण आहे बादल
बादल बालकदास गजभिये हा गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी आहे.२०१३ मध्ये बादलवरील आईचे छत्र हरपले. यानंतर अंत्यत विपरित परिस्थितीत बुध्द विहारात अभ्यास करुन बादलने स्पर्धा परीक्षा उर्तीण केली. लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याच नाव आले आहे. बादलची आई कॅन्सरशी झुंज देत होती.तिच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा बादल व त्यांच्या दोन भावडांनी मिळेल ते काम करुन आईवर उपचार केले.मात्र नियतीने त्यांच्यावरील आईचे छत्र हिरावून घेतले.मात्र यानंतर बादलने न डगमगता सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांच्या मदतीने त्याने आपले ध्येय गाठले.त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने तो आज सामाजिक न्यायदिनी विवाहबंधनात अडकला.
विविध मान्यवरांची उपस्थिती
बादल आणि एकता हे सामाजिक न्याय दिनी विवाहबंधनात अडकले. त्यांना आर्शीवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जि.प.समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.हाश्मी, सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, सेवानिवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके उपस्थित होते.

Web Title: Social message from orphan bride-groom wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.