सामाजिक एकता ही समाजाची शक्ती आहे (शिवाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:46+5:302021-02-20T05:25:46+5:30

गोंदिया : समाजाची एकता ही त्याची शक्ती व सामर्थ्य आहे. समाजाची प्रगती होऊ द्या आणि एक मजबूत समाज म्हणून ...

Social unity is the power of society (Shivaji) | सामाजिक एकता ही समाजाची शक्ती आहे (शिवाजी)

सामाजिक एकता ही समाजाची शक्ती आहे (शिवाजी)

Next

गोंदिया : समाजाची एकता ही त्याची शक्ती व सामर्थ्य आहे. समाजाची प्रगती होऊ द्या आणि एक मजबूत समाज म्हणून समाज प्रस्थापित करा असे प्रतिपादन झाडे कुणबी समाजाचे सचिव निलेश चुटे यांनी केले.

येथील झाडे कुणबी समाजाच्या वतीने सचिव कुंदा दोनोडे यांच्या निवासस्थानी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज चंद्रकुमार चुटे होते. पाहुणे म्हणून सुरेश बहेकार, भूमिका हुकरे, गजानन डोये, उपाध्यक्ष नोव्हिल ब्राम्हणकर, दीप्ती तावडे, कोषाध्यक्ष संतोष मुनेश्वर, संघटना सचिव कुंदा दोनोडे, सहसचिव सुजाता बहेकार, दोनोडे, राहुल खोटेले, राजेश हुकरे, गौरव बहेकार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करुन शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रभाकर दोनोडे, काशीराम हुकरे, सुरेश बाहेकर, नितेश दोनोडे, रामू चुटे, जितेंद्र शिवणकर, राजेंद्र पाथोडे, चिराग फुंडे, अभिजित दोनोडे, अंकित डोये, कनक दोनोडे उपस्थित होते.

Web Title: Social unity is the power of society (Shivaji)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.