समाजाला संतांच्या विचाराची गरज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:27 AM2021-02-07T04:27:41+5:302021-02-07T04:27:41+5:30
साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, ...
साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म व समाज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. संतांनी विवेकाची शिकवण दिली. त्यांचे विचार समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाजाने संतांच्या विचारांचे अनुसरण करावे ,असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सार्वजनिक विठ्ठल-रुखमाई सेवा समितीच्यावतीने लोटांगण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामकथा व समाजप्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन माजी आमदार संजय पुराम तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हा प्रतिनिधी वंदना काळे, भाजपा महिला सदस्य टीना चुटे, राकाँपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, प्रा.सागर काटेखाये, देवराम चुटे, संजय दोनोडे, राजू काळे, माधोराव बागडे, गोसावी आसोले, सेवानिवृत्त तलाठी भरतराम चिंधालोरे, देवराम खोटेले, सुरेश बोहरे, लखनलाल बागडे, प्रमिला बागडे, ममता चुटे, कांता शेंडे, शशीकला चिंधालोरे, अनुसया आसोले, मनिराम शेंडे, विद्या बागडे, संजय बागडे, भागवत बागडे, संतोष बागडे उपस्थित होते.
३ दिवसीय कार्यक्रमात रामकथा तसेच ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती’ विषयावर प्रभुदास महाराजाचे जाहीर कीर्तन पार पडले. गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. माजी आमदार पुराम यांनी, संतांनी समाजाला अध्यात्माचा अमोल ठेवा दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रामलाल जिंदाकुर यांनी मांडले. संचालन राजेश चुटे यांनी केले. आभार जितेंद्र आसोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय बागडे, मोहन बागडे, भूमेश शेंडे, नवरत्न गायधने, लीलाधर कठाणे, गुरुदेव शेंडे तसेच बचत गट व विविध मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य केले.