SSC Result 2019: नागपूर विभागात गोंदिया दुसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:35 PM2019-06-08T15:35:11+5:302019-06-08T15:36:47+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात दुसरे स्थान पटकाविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात दुसरे स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातील एकूण २१ हजार ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १४ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६६४० विद्यार्थी तर ७७७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. २६६० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीण झाले. प्रथम श्रेणीत ६७९३, व्दितीय ४५४७ विद्यार्थी उत्तीण झाले. दहावीच्या निकालातही बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात घट जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे.