मंजूर तलाठी कार्यालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 09:36 PM2018-06-23T21:36:42+5:302018-06-23T21:38:42+5:30
तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली. परंतु १० महिने लोटूनही सदर तलाठी कार्यालय सुरु करण्यात आले नाही. सदर तलाठी कार्यालय त्वरित सुरु करण्यात यावे. या आशयाचे निवेदन चिचगावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्रकुमार बी.कटरे यांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिले. तसेच त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधि कागदपत्रे घेण्यासाठी १० ते २० कि.मी.पर्यंत प्रवास करुन तलाठी कार्यालयापर्यंत जावे लागते. अनेकदा तलाठी कार्यालयात राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांना वांरवार चकरा मारव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे विविध कामे वेळेवर होत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. तलाठी कार्यालय गावापासून आठ कि.मी.च्या आत असावे.या उद्देशाने शासनाने मागील वर्षी गोरेगाव तालुक्यातील घोटी, हिरडामाली, निंबा, बाम्हणी, चिचगाव, बोळुंदा येथे स्वतंत्र सहा तलाठी कार्यालय २४ आॅगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मात्र महिन्याचा कालावधी लोटूनही तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले नाही. परिणामी येथील शेतकऱ्यांना विविध महसुली कागदपत्रांसाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेणे त्वरीत तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात राजेंद्र तुरकर, मुकेश बावणे, मदन कोटांगले, नामदेव नाईक, रमेश वट्टी, भोजराज बघेले, अशोक शेंडे, अनुराग सरोजकर, भोजराज पारधी, छोटू पारधी, विलास लांजेवार, अशोक रंगारी, भूमेश्वर पारधी, राधेशाम बिसेन, युवराज पारधी, योगेश पारधी यांचा समावेश होता.