शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

अर्जुनी-मोरगाव-कोहमारा बस तत्काळ सुरू करा

By admin | Published: June 05, 2016 1:32 AM

आज कानाकोपऱ्यात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. मात्र येथील अर्जुनी-मोरगाव-कोहमारा या मार्गाची बस सेवा पूर्णपणे बंद आहे.

बाराभाटी : आज कानाकोपऱ्यात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. मात्र येथील अर्जुनी-मोरगाव-कोहमारा या मार्गाची बस सेवा पूर्णपणे बंद आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची कोंडी होत असून त्यामुळे आॅटोवाल्यांची मनमर्जी वाढली आहे. तत्काळ ही बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सदर मार्गावर बस नसल्याने या मार्गावर आॅटोवाले प्रवाशांना खूपच लुटत आहेत. आपल्या मर्जीने तिकीट प्रवाशांकडून घेतात व अकरा ऐवजी १६-१७ प्रवासी कोंबून नेतात. थोड्या अंतरासाठीही वाढते दर लावले जात आहे. या मार्गावरून बस नसल्याने हा सर्व प्रकार सुरू आहे. १ जून रोजी तर अर्जुनी-नवेगावबांध या मार्गावरील आॅटो बंदच असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच फसगत झाल्याचे दिसले. अशा प्रकाराकडे कोणताच मंत्री, खासदार, आमदार व जनप्रतिनिधी ल क्ष देत नाही आहे. यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांची चांगलीच कोंडी होताना दिसते. शालेय सत्र सुरू असताना शाळेच्या बस धावतात. पण प्रवाशांची बस मात्र कधीच दिसत नाही. मग नाईलाजास्तव आॅटोने कोंडलेला प्रवास करावा लागतो. अधीकची तिकीट सुध्दा मोजून द्यावी लागते. अशी प्रवाशांची लुट या रस्त्यावर पाहायला मिळते. ग्रामीण भागातून सुध्दा बस सेवा सुरू आहे. पण या मार्गावर बस धावतांना कधी दिसेल असा सवाल प्रवासी करीत आहेत. करिता अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा ही बस तत्काळ सुरू करावी अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी, खैरी, देवलगाव, डोंगरगाव, कवठा, बोळदे, ब्राह्मणटोला, चापटी या गावातील प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)