भटक्या मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:22 PM2019-01-14T22:22:07+5:302019-01-14T22:22:31+5:30

येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती पासून ‘लेक शिकवा-लेक वाचवा’ अभियान अविरत चालू आहे. शनिवारी (दि.१२) शाळा बाह्य मुलांचा शोध या उपक्र मांतर्गत शहर परिसरात शाळेतील शिक्षक यशवंत टेंभुर्णे, निखील नागलवाडे व यू.आय. खुटमोडे यांनी शोध घेतला असता वडेगावच्या बाजूला तंबू टाकून भटकंती करून गॅस व स्टोव्ह दुरूस्ती करून आपला उदरनिर्वाह करणारे नाथ जोगी समाजातील काही मुलं आढळले.

In the stream of education brought by natives | भटक्या मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

भटक्या मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

Next
ठळक मुद्देशाळा बाह्य मुलांचा शोध : जिल्हा परिषद हायस्कूलचा स्तुत्य उपक्र म

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती पासून ‘लेक शिकवा-लेक वाचवा’ अभियान अविरत चालू आहे. शनिवारी (दि.१२) शाळा बाह्य मुलांचा शोध या उपक्र मांतर्गत शहर परिसरात शाळेतील शिक्षक यशवंत टेंभुर्णे, निखील नागलवाडे व यू.आय. खुटमोडे यांनी शोध घेतला असता वडेगावच्या बाजूला तंबू टाकून भटकंती करून गॅस व स्टोव्ह दुरूस्ती करून आपला उदरनिर्वाह करणारे नाथ जोगी समाजातील काही मुलं आढळले.
त्यांच्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी शाळेत पाठवण्याची ईच्छा व्यक्त केली. यात संदिप आनंद मांडवकर (१२),गोकुल साहेबराव चव्हाण (११), तन्नू देशू चव्हाण (१३) व जोत्सना (९) वर्ष या चारही विद्यार्थ्यांना त्यांच्या आईसोबत शाळेत आणले.
या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पेन , नोटबुक व चॉकलेट भेट देऊन प्रभारी मुख्याध्यापक माया भौतिक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आर.एस. डोये, ए. पी. मेश्राम, डी. पी. डोंगरावर, डब्लु. एम. परशुरामकर, जी. बी. डोंगरावर, सी. एम. भीवगडे, पूजा पाटील, आय. वाय. रहांगडाले, सावळकर उपस्थित होते. यातील संदिप व गोकुल यांना इयत्त ६ वी तर तन्नूला इयत्ता ८ वीत बसविण्यात आले.
ज्योत्सनाला वडेगाव येथे इयत्त ४ थीत पाठविण्यात आले. आई-वडील यांच्याशी संवाद साधला असता आमचा मुक्काम या परिसरात असेपर्यंत मुले रोज शाळेत येतील असे सांगितले.

Web Title: In the stream of education brought by natives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.