लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-तिरोडा राज्यमार्गावरील एमआयडीसी मुंडीपार येथे मंगळवारी (दि.४) सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडलेल्या अपघातात १ विद्यार्थिनी ठार तर ८ विद्यार्थिनी जखमी झाल्या. मृत विद्यार्थिनीचे नाव नेयत्री सचिन मेंढे (४, रा.मुंडीपार) असे आहे. हे सर्व विद्यार्थी भानपूर येथील ‘स्कूल आॅफ इंटरनॅशनल’ कान्व्हेंटचे विद्यार्थी आहेत.नेहमीप्रमाणे परिसरातील विद्यार्थी घेऊन जात असलेल्या टाटा सुमो क्रमांक एमएच ३५-एम १२७ चा चालक दखने याचे नियंत्रण सुटल्याने सुमो झाडाला आदळली आणि ४ पलट्या मारून रस्त्याच्या कडेला उलटली. गाडीत नेयत्री मेंढे ही वाहनचालकाच्या शेजारच्या सीटवर बसली होती. अपघातात तिच्या डोक्यावर जबर मार लागला व तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गाडीत बसलेले आचल रविंद्र पाठक, राजीव रविंद्र पाठक, हिमांशू चंदन दमाहे (रा.एमआयडीसी मुंडीपार), दक्ष भोजराज पटले, प्रणव नरेश बिसेन, अमन अंकुश बर्वै, प्रणाली नरेश बिसेन (रा.सेजगाव) हे विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना येथील केटीएस रूग्णालयात आणले होते.सदर वाहन सुभाष कामेश्वर बोपचे यांच्या नावावर असून त्यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचा स्कुल बसकरीता लागणारा परवाना नाही. तर वाहनचालक दखने याने घटनास्थळावरु न पळ काढला. या अपघातामुळे गावखेड्यात ज्या खासगी कान्व्हेंट सुरु झालेल्या आहेत आणि इतर गावातून वाहनाद्वारे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या न- आणवर आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या अपघातातील टाटा सुमोचालकासह कान्व्हेंट संचालक व मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थी वाहून नेणाºया वाहनांच्या परवानगीसोबतच सुरक्षीततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.सोबतच शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हे गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असताना खासगी शाळांना परवानगी देतातच कसे हा सुद्धा प्रश्न आहे. वाहनचालकाच्या दुर्लक्षतिपणा व मुख्याध्यापकाचा निष्काळजीपणामुळे मेंढे कुटुंबियांना 4 वर्षाच्या मुलीला गमवावे लागले आहे. तेवढाच दोष अवैध वाहनातून आपल्या पाल्यांना शाळा, कान्व्हेंटमध्ये पाठविणाºया पालकांचा आहे. या अपघातातनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सदर वाहनमालकावर कारवाई प्रस्तावित केली असून परिवहन विभागाच्या भरारी पथकाला घटनास्थळाचा पंचनामा करु न वाहनचालक व मालकाविरु ध्द कारवाईचे निर्देश दिले आहेत.नियमबाह्यपणे खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकावर गुन्हा नोंद करून मुख्याध्यापकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्या संदर्भात पोलीस विभागाला निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे, पालकांनीही आपल्या पाल्यांना खाजगी वाहनांतून शाळेत पाठवू नये.- विजय चव्हाणउप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गोंदिया
विद्यार्थी नेणाऱ्या टाटा सुमोला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:00 PM
गोंदिया-तिरोडा राज्यमार्गावरील एमआयडीसी मुंडीपार येथे मंगळवारी (दि.४) सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडलेल्या अपघातात १ विद्यार्थिनी ठार तर ८ विद्यार्थिनी जखमी झाल्या. मृत विद्यार्थिनीचे नाव नेयत्री सचिन मेंढे (४, रा.मुंडीपार) असे आहे. हे सर्व विद्यार्थी भानपूर येथील ‘स्कूल आॅफ इंटरनॅशनल’ कान्व्हेंटचे विद्यार्थी आहेत.
ठळक मुद्देविद्यार्थिनी ठार, ८ जखमी : मुंडीपार एमआयडीसी येथील घटना