ऑनलाईन लोकमतगोंदिया : विदर्भावर पर्यावरणाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत सुद्धा विविधता आढळते. या संस्कृतीचे जतन करुन भावी पिढीला त्याची माहिती मिळावी. पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे, यासाठी मागील वीस वर्षांपासून प्रभाकर लोंढे यांची धडपड सुरू आहे. त्यांच्यातील धडपड आणि अभ्यासाची दखल घेत त्यांची जागतिक स्तरावर होणाऱ्या परिषदेसाठी नुकतीच निवड करण्यात आली.मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी असलेले डॉ. प्रभाकर लोंढे हे तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथील जि.प.कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अर्थ फेडरेशन मुव्हमेंट अंतर्गत अमेरिका येथे होणाºया जागतिक परिषदेसाठी निवड करण्यात आली. याच अनुषंगाने लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. लोंढे हे प्राचार्य असले तरी साहित्य आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मौखीक साहित्य या विषयात त्यांनी संशोधन केले आहे. कुरमार, वेदना उपेक्षितांच्या काव्य संग्रह, त्रिवेणाई हे नाट्यसंग्रह, धनगरांची राजकीय दुरवस्था ही त्यांची चार पुस्तके सुध्दा प्रकाशीत झाली आहेत. महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळावर व मराठी विश्व कोष मंडळावर नोंद लेखक म्हणून सुध्दा त्यांची निवड झाली आहे. त्यांना विविध पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.मागील काही वर्षांत विदर्भात उद्योगांचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झाले. उद्योगांच्या विस्तारामुळे रोजगार निर्मितीत वाढ झाली. मात्र पर्यावरण विषयक निकषांकडे दुर्लक्ष केल्याने यासर्वांचे पर्यावरणावर दुष्परिणाम झाले. यासर्व गोष्टींचा लोंढे यांनी संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राचा दौरा करुन अभ्यास केला. पर्यावरणाच्या वाढत्या समस्येवर काय उपाय योजना करता येईल. तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विस्तृत लिखान केले. याच सर्व गोष्टींचा अभ्यास करताना त्यांनी कुरमार हे पुस्तक लिहिले. विदर्भातील ग्रामीण क्षेत्रात कला संस्कृतीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय करता येईल यासाठी धडपड सुरु केली. डॉ. लोंढे हे सुधीर तारे यांना गुरू मानतात. विशेष म्हणजे अमेरिका येथे ११ मे रोजी होणाºया जागतिक परिषदेसाठी महाराष्ट्रातून तीन व्यक्तींची निवड झाली त्यात डॉ. सुधीर तारे, डॉ. अनिल वाधवानी व डॉ. प्रभाकर लोंढे यांचा समावेश आहे. गुरुसह एखाद्या शिष्याची जागतिक स्तरावरील परिषदेसाठी निवड होणे ही बाब खरोखरच माझ्यासाठी मोठी असल्याचे लोंढे यांनी सांगितले. काही अडचणीमुळे डॉ.लोंढे या परिषदेत सहभागी होवू शकणार नाहीत.मात्र पुढील वर्षी १० ते ११ डिसेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या जिंदील ग्लोबल युनिर्वसीटीतर्फे दिल्ली येथे आयोजित जागतिक परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परिषदेत लोंढे हे ‘मानवधिकारी आणि मानव’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी त्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:25 AM
विदर्भावर पर्यावरणाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत सुद्धा विविधता आढळते. या संस्कृतीचे जतन करुन भावी पिढीला त्याची माहिती मिळावी.
ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावर मांडणार समस्या : डॉ. प्रभाकर लोंढे