खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:19 PM2019-01-14T22:19:59+5:302019-01-14T22:20:14+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच विविध खेळांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलांमध्ये असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Through the game, students should brighten the future | खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : तालुका क्रीडा संकुल अंतर्गत बहुउद्देशीय इमारत लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच विविध खेळांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलांमध्ये असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत सडक-अर्जुनी येथील तालुका क्र ीडा संकुलातील बहुउद्देशीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सडक-अर्जुनी नगराध्यक्ष देवचंत तरोणे होते. यावेळी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, पंचायत समिती सदस्य कविता रंगारी, तहसीलदार राजेंद्र अरमरकर, जिल्हा क्र ीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, या तालुका क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळता येतील यासाठी इनडोअर बॅडमिंटन तथा बहुउद्देशीय हॉल, पुरूष - महिला डॉरमॅट्री, व्यायाम शाळा हॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, २०० मीटर धावणपथ अशी सोय करण्यात आली आहे. तालुका क्र ीडा रस्त्याचे काम तसेच विजेची सुविधा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. या क्र ीडा संकुलात पोलीस व सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. भविष्यात या क्रीडा संकुलात जलतरण तलाव सुद्धा तयार करण्यात येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष तरोणे यांनी, तालुका क्रीडा संकुलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी निश्चितच फायदा घेवून खेळाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नावलौकीक करावे असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून जिल्हा क्र ीडा अधिकारी गांगरेड्डीवार यांनी तालुका क्र ीडा संकुलातील प्रस्तावीत क्र ीडा सुविधांबाबत विस्तृत माहिती देवून ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम प्रकारच्या क्रीडा सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करु न निर्माण होणाऱ्या क्र ीडा सुविधांमध्ये दर्जेदार क्र ीडा सुविधा देण्यात येतील असे सांगीतले.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नागपूर येथील आर्कीटेक दिनेश नवनागे, कोदामेढी सरपंच अनिता बडोले, मोहगाव सरपंच अलका पातोडे, तिल्ली-मोहगाव सरपंच प्रफुल्ला दिहारी, लक्ष्मण भगत, परमानंद बडोले, तिलकचंद डोंगरवार, मनोज बोपचे, लक्ष्मीकांत धमगाये यांच्यासह सडक -अर्जुनी तालुक्यातील खेळाडू, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन तालुका क्र ीडा अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले. आभार क्र ीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका क्र ीडा संकुलातील सर्व कर्मचारी व तालुक्यातील खेळाडूंनी सहकार्य केले.

Web Title: Through the game, students should brighten the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.