तिरोडा पोलिसांनी केले ४.२२ लाखांचे मोहफुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:50+5:302021-07-20T04:20:50+5:30
गोंदिया : तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डात १८ जुलै रोजी पाच ठिकाणी धाड टाकून अवैध दारूभट्ट्या उधळल्या असून, ...
गोंदिया : तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डात १८ जुलै रोजी पाच ठिकाणी धाड टाकून अवैध दारूभट्ट्या उधळल्या असून, चार लाख २२ हजार रुपयांची मोहफुले जप्त केली आहेत.
संत रविदास वॉर्डातील भूपेंद्र माणिक बरियेकर (४५) याच्या कडून ४८ पोती मोहफुले (९६० किलो) जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ७६ हजार ८०० रुपये सांगितली जाते. सूरज प्रकाश बरियेकर (३५) याच्याकडून ९९ हजार २०० रुपयांची १२४० किलो मोहफुले ६२ पोतडीत जप्त केली. सुखवंता बाबूराव बरियेकर (५५) हिच्या घरातून ४६ हजार ४०० रुपये किमतीची ५८० किलो मोहफुले २१ पोतडीत जप्त केली. थेजपार येथील देवेंद्र सुरेश गिरी (२४) याच्या जवळून ५९ हजार ६०० रुपयांचे ७२० किलो मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले. तर संत रविदास वॉर्डातील दिलीप घनश्याम बरियेकर (३२) याच्याकडून ११७ पोतडीत १७५५ किलो मोहफुले जप्त केली असून, त्याची किंमत एक लाख ४० हजार रुपये आहे. ही कारवाई महिला नायक पोलीस शिपाई रूपाली मडावी, संजू बांते, नंदा बडवाईक, भूमेश्वर भैरम, जगतराम बर्वे व इतर पोलिसांनी केली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.