कारसह दोन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:14+5:30

गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते.

Two lakhs of alcohol was seized along with the car | कारसह दोन लाखांची दारू जप्त

कारसह दोन लाखांची दारू जप्त

Next
ठळक मुद्देदेशी-विदेशीचा समावेश : देसाईगंज पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातून दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत येत असलेली देशी-विदेशी दारू देसाईगंज पोलिसांनी सलग दुसऱ्यांही दिवशी जप्त केली. यात कारसह देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारच्या रात्री करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते.
दरम्यान एमएच ३०, एए ३३३१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार येताना दिसली. त्या कारला थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारू सुप्रिम नं.१ या कंपनीच्या ९० मिलीच्या ३१०० सिलबंद बाटल्या (किंमत १,८९,००० रुपये), इंपेरियल ब्ल्यू या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या (किंमत १२,००० रुपये) आणि मारूती सुझुकी कंपनीची कार (किंमत ४ लाख) असा एकूण ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच वाहनचालक नितीन विश्वमित्र शर्मा रा.देसाईगंज याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, हवालदार वासुदेव अलोणे, भावेश वरगंटीवार, श्रीकृष्ण जुवारे, अमोल पोटवार आदींनी केली.
सोमवारच्या रात्री एका मालवाहू वाहनातून येणाऱ्या दारूच्या बाटल्या जप्त केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून दारू वाहतूक झाल्यामुळे या व्यवसायात अनेक दारू तस्कर गुंतले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Two lakhs of alcohol was seized along with the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.