रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:20+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी  गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१), रा. विठ्ठल- रुक्मिणी चौक, छोटा गोंदिया या रुग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इंजेक्शनसह अटक केली आहे.

Two more arrested for blackmailing remedicivir injections | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बाहेकर हॉस्पिटलमधून येत होते बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सरकारी रुग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न लावता तेच इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि.५) रंगेहाथ पकडले आहे. गोंदिया शहरातील नामांकित असलेल्या बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन रुग्णांना न लावता बाहेर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी  गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१), रा. विठ्ठल- रुक्मिणी चौक, छोटा गोंदिया या रुग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इंजेक्शनसह अटक केली आहे. तो  प्रत्येकी १५ हजार रुपयांत या इंजेक्शनची विक्री करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून त्याला अडकविले. बाहेकर हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या अमोल चौधरी याच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्याने हे इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. सफाई कामगार संजय तुरकर याला विचारणा केल्यावर त्याने बाहेकर हॉस्पिटलमधील एका नर्सकडून आणल्याचे सांगितले. ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,  पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार लिलेंद्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे.  तिन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.च्या कलम ४२०, १८८, ३४, सहकलम २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 

रुग्णांना इंजेक्शन न लावता जात होते काळ्याबाजारात विक्रीला 
बाहेकर हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका चालक अमोल नितेश चौधरी याने सफाई कामगार  संजय रमेश तुरकर, रा. छोटा गोंदिया यांच्याकडून ते इंजेक्शन आणले.  संजय तुरकरने ते इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलधील नर्सकडून आणल्याचे सांगितले. हे तिन्ही कर्मचारी बाहेकर हॉस्पिटलमधील आहेत. अमोलच्या पँटच्या खिशातून दोन मिथिल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शन मिळून आले. त्याने रेमडेसिविर व मिथिल प्रेडनिसोलोन इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलमधून आणल्याचे सांगितले.

 

Web Title: Two more arrested for blackmailing remedicivir injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.