आरोपी राहुल लीलेश्वर पाल ऊर्फ इमरान सलीम शेख (२४) रा. गौतमनगर गोंदिया, अनुज जगदीश चौधरी (१९) रा. परमात्मानगर सूर्याटोला या दोघांना व दोन विधी संघर्षित बालकांना पकडले होते. दोन विधी संघर्षित बालकांना नागपूरच्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. आरोपींनी घरडे यांच्या घरून एलईडी व होम थिएटर, संगीता सुखदेवे यांच्या घरून एलईडी, शक्तिसिंग बैस यांच्या घरून एलईडी व इतर घरगुती भांडी, नामदेवराव मेश्राम यांच्या घरून एलईडी चोरल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत एक लाखांच्यावर आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, संतोष सपाटे, सहायक फौजदार घनश्याम थेर, पोलीस नायक सुबोध बिसेन, ओमेश्वर मेश्राम, जागेवर उईके, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, योगेश बिसेन, सतीश शेंडे, दीपक रहांगडाले, संतोष भेंडारकर, छगन विठ्ठले, विकास वेदक यांनी केली.
दोन चोरट्यांनी दिली पाच गुन्ह्यांची कबुली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:19 AM