शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या”; शिंदेसेनेतील नेत्याचे विधान
2
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण
3
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
4
चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा वेग किती असावा? या गोष्टी लक्षात असुद्या...
5
“मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; Mumbai Indians ने विकत घेतलेला Deepak Chahar नाराज?
6
झोमॅटोची खास ऑफर! सहा महिन्यांपर्यंत मिळेल फ्री फूड डिलिव्हरी!
7
EVM हॅकिंगचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल;  निवडणूक आयोगाने दिलं सविस्तर स्पष्टीकरण
8
२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...
9
BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी
10
कृष्णासोबत भांडणाचं नेमकं काय कारण होतं? अखेर गोविंदाने खुलासा केला; म्हणाला- "माझी बायको त्यावेळी..."
11
मनसेला पुन्हा धक्का! पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र
12
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
13
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
14
VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
15
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
16
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
17
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
18
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!
19
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
20
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क

पाथरी गावात बेरोजगारीची समस्या

By admin | Published: January 03, 2015 1:31 AM

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाला दत्तक घेतले आहे. तेव्हापासून या गावाचा सर्वांगीण विकास होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.

कुऱ्हाडी : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाला दत्तक घेतले आहे. तेव्हापासून या गावाचा सर्वांगीण विकास होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. मात्र सदर गावात बेरोजगारीची समस्या सध्या आवासून उभी आहे.ना. पटेलांनी पाथरी गाव दत्तक घेतल्यापासून गावातील चावडीवर गावाचा विकास होणार, बगिचा तयार होणार, पाण्याची, रस्त्यांची, नाल्यांची सुविधा होणार, अशी चर्चा जोमात सुरू आहे. परंतु गावातील बेरोजगारीचे काय? अशी चर्चासुद्धा चावडीवर केली जात आहे. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर ५० टक्के तरूण-तरूणी बेरोजगार आहेत. बेरोजगारांची मोठी फौजच गावात उभी आहे. परंतु त्यांना रोजगाराची कसलीही संधी उपलब्ध होत नाही. दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले युवक-युवती गावात आहेत. मात्र बेरोजगारच. येथील ५० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी कटंगी तलावात बुडीत झाल्या. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले व त्यांच्या पाल्यांच्या नशिबी बेरोजगारीच आली. गावाच्या सौंदर्यीकरणासोबतच बेरोजगारीची समस्या मिटविणे अगत्याचे आहे. पाथरी गावालगत कुऱ्हाडी, हिरापूर, मलपुरी, बोळूंदा, तिमेझरी येथील लोक शेती व्यवसायावर अवलंबून राहू शकत नाही. त्यांना वर्षातून सहा महिने तरी रोजगार मिळेल, अशी योजना राबविणे गरजेचे आहे. जर या परिसरात एखादा उद्योगधंदा उघडला तर बेरोजगारांच्या हातांना काम मिळू शकेल. तिरोडा क्षेत्रात अदानीचा वीज प्रकल्प, साकोलीत अशोक ले-लँड, भंडाऱ्यात सन फ्लॅग याच धर्तीवर गोरेगाव या तालुकास्थळीसुद्धा एखादा मोठा उद्योग उघडून स्थानिक लोकांना रोजगार देणे गरजेचे आहे. तरच ग्रामस्थांना जीवन जगण्यास मदत होईल. पाथरी गावाच्या विकासासह बेरोजगारांच्या हातांना काम देवून विकास घडवून आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)