तब्बल २१४०८ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:08+5:302021-07-26T04:27:08+5:30
कपिल केकत गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असतानाच आतापर्यंत ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शिवाय दिवसेंदिवस लसीकरणाची ...
कपिल केकत
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असतानाच आतापर्यंत ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शिवाय दिवसेंदिवस लसीकरणाची ही आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र विशेष म्हणजे, ३ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक २१४०८ नागरिकांच्या लसीकरणाची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे ३ जुलै रोजी लसीकरणाचा जिल्ह्यातील रेकॉर्ड बनला असून हा दिवस ‘हायेस्ट व्हॅक्सीनेशन डे’ ठरला आहे.
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ४४९५०३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ११३८८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. तर लसीकरणाशिवाय आता उपाय नसल्याचे जाणून घेत नागरिक स्वत:च लसीकरणासाठी पुढे येऊन लागले असून यामुळे आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे.
असे असतानाच मात्र ३ जुलै हा दिवस जिल्ह्यासाठी खास ठरला असून या दिवशी जिल्ह्यात तब्बल २१४०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरणाची नोंद झाली नसून यामुळेच ३ जुलै ने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. शिवाय हा दिवस जिल्ह्यात ‘हायेस्ट व्हॅक्सीनेशन डे’ म्हणून नोंद करण्यात आला आहे.
------------------------------
जिल्ह्यात ४३.३५ टक्के लसीकरण
शनिवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यात ५६३३८६ नागरिकांची लसीकरण झाले असून त्याची ४३.३५ एवढी टक्केवारी होत आहे. यामध्ये ४४९५०३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी ३४.५९ तर ११३८८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची टक्केवारी ८.७६ एवढी आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्हा आघाडीवर असतानाच फक्त ८.७६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेणे हे मात्र अपेक्षित नाही.
--------------------------------
तरुणांची आगेकूच सुरूच
जिल्ह्यात २२ जूनपासून १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून या गटातील तरुण व युवांनी लसीकरणासाठी धाव घेतली आहे. परिणामी जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यात या गटातील १६४९१८ तरुणांनी लस घेतली असून यात १५२१४१ तरुणांनी पहिला तर १२७७७ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. यानंतर आता हा गट आकडेेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
--------------------------------------
३ जुलै रोजीचा लसीकरणाचा तक्ता
गट पहिला डोस दुसरा डोस एकूण
आरोग्य कर्मचारी -- ०२ ०२
फ्रंटलाईन वर्कर्स ०५ ०३ ०८
१८-४४ १५१३७ ५८३ १५७२०
४५-६० २७७५ १४२८ ४२०३
६० प्लस ८३७ ६३८ १४७५
एकूण १८७५४ २६५४ २१४०८