सर्वच प्रमुख पक्षांचे विजयाचे दावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:14+5:302021-01-19T04:31:14+5:30
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी, सर्वच प्रमुख पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकूण ...
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी, सर्वच प्रमुख पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकूण १८१ जागांपैकी ८१ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर ६९ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व स्थापन केल्याचे दावे-प्रतिदावे केले आहे.
गोंदिया तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी १५ भाजप, ७ काँग्रेस-राकाँने आणि अपक्षांनी १५ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांना १४ ग्रामपंचायतीवर तर माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी १५ ग्रामपंचायतींवर आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा या तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजपला फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले. गोरेगाव, आमगाव तालुक्यात महाविकास आघाडीला कल मिळाला, तर सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी वर्चस्वाचे दावे केले आहेत. मात्र याचे खरे चित्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
......
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
तालुका ग्रामपंचायतींची संख्या
गोंदिया ३७
सडक अर्जुनी ३७
गोरेगाव २५
तिरोडा १८
अर्जुनी मोरगाव २५
देवरी २७
आमगाव २१
सालेकसा ०९
.......................
एकूण १८१