लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत जिल्हा पोलिसांकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी चार दिवस विकास शांती यात्रा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त असलेल्या गावांत भ्रमण करणार आहे.जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाची योजना आहे. या नक्षलग्रस्त गावातील जनता भयमुक्त रहावी, यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प केला आहे. आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य पोलीस विभाग करीत आहे. आदिवासी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, व्यायाम शाळा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृध्दांना श्रावण बाळ योजनेचा लाभ या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.या शांतीयात्रेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. गावागावातील महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली.गोंदिया जिल्ह्यातील ११४ पैकी ४८ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून विकासात्मक कार्याचे पाऊल उचचले. उर्वरित ६६ गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाने विकास शांती यात्रा सुरू केली आहे.जिल्ह्यातील शंभर टक्के गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा मानस बांधून त्या दिशेने नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी म्हणजेच २४ ते २७ जुलै या कालावधीत नक्षलग्रस्त गावात विकास शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत जि.प., पं.स., सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे, महिला आर्थिक विकास महामंडळ अशा शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग होता.गणूटोला एओपी अंतर्गत येणाºया या गावात स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी विकास शांती यात्रेत सहभाग घेतला.इतर पोलीस अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते.
११४ गावांत विकास शांती यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:26 AM
जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत जिल्हा पोलिसांकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देआदिवासी जनतेशी समन्वय : नक्षलवाद्यांच्या कृत्यांना आळा घालणार